________________
करून परमात्मभावात एकाग्र होतात.
प्रमोदभावना - दुसऱ्यांना सत्कर्म करताना पाहून आनंदित होणे दुसऱ्यांच्या गुणांनी प्रशंसा करणेही प्रमोद भावना आहे.
प्रमोदभावना वरदानरूप आहे. कारण गुणरहित व्यक्ती पण गुणीजनांची प्रशंसा करून अनेक गुण प्राप्त करतो. सत्कार्य न करता मात्र सत्कार्य करणाऱ्यांचे अनुमोदन केले, प्रमोदभावनेने प्रशंसा केली, तरी सत्कार्य करण्याइतके फळ प्राप्त होते असा महानलाभ का सोडावा ?
प्रमोदभावनेत कोणत्याही प्रकारे मेहेनत न करता भरपूर लाभ होतो. अश्या ह्या भावनेला सर्वांनी आत्मसाथ केली पाहिजे.
कोणत्याही व्यक्तीचे गुण ऐकून इर्षेने जळणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रमोदभावना प्रकट होऊ शकत नाही. इतकेच काय त्या मैत्रीभाव असला तर तो पण नष्ट होतो. मैत्रीभावनेला खीलविण्यासाठी मैत्री भावनेचे अनुसरण करण्यासाठी प्रमोदभावना फार आवश्यक आहे.
कुणाची ही चढती बधुन आनंदीत व्हावे. कुणाची गुणवृद्धिी पाहून प्रसन्न व्हावे. शत्रूत असलेल्या गुणांना पाहून पण आनंदाची अनुभूती व्हावी. असे पवित्र हृदय ज्याचे आहे त्यालाच प्रमोदभावना फलिभूत होते.
करुणाभावना - ही तिसरी योगभावना आहे. प्रेम, करुणा, दया हा प्रकृतीचा सहज नियम आहे. ह्यांच्याअभावी दुःख निर्माण होते. मैत्री दया, करुणा इत्यादींसाठी कोणतेही मूल्य चुकवावे लागत नाही.
It does not Cost to be Kind.
या जगात अनाथ, वृद्ध, विधवा, अपंग, रोगी, गरीब विद्यार्थी पशू, पक्षी असे करुणा करण्यासारखे अनेक मनुष्य व तिर्यंच प्राणी आहेत. त्या सर्वांच्या रक्षणासाठी पैसा असेल तर पैश्याने, पैसा नसेल तर मनोबलाने, वाचेने अर्थात् वाणीचा सदुपयोग करून अथवा स्वतःच्या शरीराने गर्व सोडून दुसऱ्याचे रक्षण करणे ही करुणाभावना आहे..
सर्वज्ञ परमात्माने दया, करुणा, अनुकंपा ह्या गुणांना मूळ गुण अथवा पायाचे गुण म्हटले आहे. धर्म आराधनेसाठी या गुणाची खूपच आवश्यकता आहे. जितकी करुणा जास्त तितक्या लवकर हित साध्य होते. म्हणून ह्या भावनेचा सतत अभ्यास केला पाहिजे.