________________
P
(७३१)
चिंतन केले तर संसार, शरीर आणि भोगांच्या प्रती विरक्ती आल्याशिवाय रहात नाही.
___ जेव्हा हा आत्मा शरीर आणि पदार्थांपासून विरवत होतो तेव्हा आत्मशुद्धीच्या दिशेने पुढे वाटचाल करण्यासाठी आम्नवभावनेत, आत्म्यात उत्पन्न होणाऱ्या मिथ्यात्व, कषाय इत्यादींच्या स्वरूपाला समजावून त्याची दुःखरूपता, आणि आत्म्याच्या सुख स्वरूपाचे आसवांपासून दृष्टी दूर करून संवर निर्जरा भावनेत अतीन्द्रिय आनंदरूप संवर निर्जरा तत्त्वांचे ज्ञान प्राप्त करतो. आस्रव, संवर व निर्जरातर स्पष्टपणे तत्त्वांची नावे आहेत, ह्याचे चिंतन पण तत्त्वपरकच आहे.
लोक भावनेत लोकाचे स्वरूप दाखवून ह्या लोकांमध्ये जीवात्म्याचे झालेले जन्ममरण इत्यादींचे वर्णन करून पुढे बोधिदुर्लभ भावनेत सांगितले आहे की ह्या लोकामध्ये सर्वकाही प्राप्त होणे सुलभ आहे. परंतु एक रत्नत्रयी प्राप्त करणे अत्यंत दुर्लभ आहे. जर रत्नत्रयी प्राप्त झाली तर संसारात परिभ्रमण करावे लागणार नाही. शेवटच्या धर्म भावनेत रत्नत्रय आरधनेची आवश्कयता इत्यादींचे वर्णन करून धर्माचे प्रकार आदींचे विवेचन केले आहे. धर्माची आराधना करणे हीच मनुष्यजन्माची सार्थकता आहे. अशा प्रकारे बारा भावनांची चिंतन प्रक्रिया अत्यंत अद्भूत आहे. कारण ह्याच्यात संसार, शरीर आणि भोगात गुरफटलेल्या जगाला अनन्तसुखाच्या मार्गात स्थापित करण्याचे सफल प्रयोग आहेत. बारा भावनेचे चिंतन आत्मार्थी साधकाचे सर्वाधिक प्रिय मानसिक, दैनिक भोजन आहे.
जैन साहित्यात भावनेचा विकास - जैन आगम साहित्याचे अवलोकन करताना हे स्पष्टपणे दिसून आले की भावनेसंबंधी जसे आगमोत्तर काळच्या साहित्यात क्रमिक वर्णन आहे तसे आगमात नाही. परंतु ठिकठिकाणी भावनेचे वर्णन अवश्य प्राप्त होते. कुठे धर्मध्यानात स्थिर होण्यासाठी तर कुठे महाव्रतांच्या रक्षणाच्या रूपात भावनेचे वर्णन प्राप्त होते. उत्तराध्ययन, बृहत्कल्पभाप्य इत्यादी भावनेविषयी कोणतेच स्वतंत्र आगम ग्रंथ नाही.
आगमोत्तर काळात अनेक महान दर्शन शास्त्रांच्या चिंतकांनी आपले भावनेविषयी चिंतन कोणी संपूर्ण ग्रंथरूपात तर कोणी प्रकरण, सर्ग अथवा सूत्ररूपात व्यक्त केले आहे. अशाप्रकारे भावनेचा जसा क्रमिक विकास दिसून येतो तसा साहित्यात पण उत्तरोत्तर विकास झालेला आहे.
आगमग्रंथात विखुरलेल्या भावनेच्या पुष्पांना आगमोत्तर काळच्या लेखकांनी मालिकेचे स्वरूप दिले. विखुरलेल्या पुष्पांना गोळा करण्यासाठी कष्ट पडतात. परंतु माळ ग्रहण करणे सहज व सरळ आहे.