________________
कमी झाले आहे व उपासना वाढली आहे. परिणामस्वरूपी धार्मिक दिसणाऱ्या व्यक्तींचा व्यवहार पण अपराधपूर्ण होऊ लागला आहे. मात्र उपासनेने परमात्म्याचा साक्षात्कार होत नाही कारण आचरण रहित क्रियाकर्म कित्येकदा मात्र अभिनयच असते. म्हणूनच आचरण शुद्धीसाठी ह्या धर्मभावनेत सागार आणि अणगार धर्माचे विवेचन केले आहे. अकरा प्रतिमांचे वर्णन पण केले आहे. अशा प्रकारे ह्या बारा भावनांच्या चिंतनात मानव मात्राच्याच काय पण जीवमात्राच्या कल्याणाची भावना आहे. सर्व जनहिताय, सर्वजनसुखाय अशी प्रवृत्ती करण्याची प्रेरणा ह्या भावनेच्या चिंतनाने प्राप्त होते.
संस्कृत, प्राकृत, प्राच्य भाषांशिवाय हिन्दी, मराठी, गुजराती, राजस्थानी, इंग्रजी इ. भाषेतही या भावनेचे विवेचन केले गेले आहे. आगमापासून चालत आलेला हा दिव्यभव्य, पावन, वैचारिक स्रोत वर्तमान युगीन मनिषींच्या सुंदर गेय काव्याच्या रूपात अतिशय प्रेरक स्वरूपात उपलब्ध आहेत. हा मुमुक्षूच्या दृष्टीने फार भाग्याचा विषय आहे.
बारा भावनांचा क्रमिक विकास - सर्वसामान्य क्रमाच्या दृष्टीने विचार केला तर प्रारंभिक सहा भावना वैराग्य उत्पादक आहेत आणि शेवटच्या सहा भावना तत्त्वपरक आहेत. प्रत्येक क्रमात पण स्वाभाविक विकास दिसून येतो जसे -
जेव्हा प्राणी पदार्थांची अनित्यता, क्षणभंगुरता इत्यादींचे अनित्य भावनेत चिंतन करतो, तेव्हा त्यांना सुरक्षित ठेवण्याचे अनेक उपाय शोधतो. नंतर मृत्यू, वृद्धत्व इत्यादी टाळण्यासाठी विचार करतो तेव्हा अशरण भावना सांगते, वियोग होणे हा संयोगाचा सहज स्वभाव आहे. त्याच्यासाठी कोणतेच औषध नाही, मणी, मंत्र, तंत्र नाहीत, जे स्वतःला अथवा स्वजनांना वाचवू शकतील अथवा शरण रूप होतील. तेव्हा मनुष्य विचार करतो की जरी काही संयोगांचा वियोग झाला तरी अन्य संयोग तर मिळतीलचना. तेव्हा संसार भावनेच्या माध्यमाने हा भ्रमपण दूर केला जातो की संयोगात सुख नाही. संयोग दुःखरूपच आहेत तरी मोहग्रस्त प्राणी विचार करतो की दुःख सगळे मिळून भोगवून घेऊ. त्याच्या उत्तरात एकत्वभावना सांगते, अरे भोळ्या प्राण्या दुःख सगळे मिळून अथवा वाटून भोगले जात नाही. ते एकट्यालाच भोगावे लागते. ह्या गोष्टीला अन्यत्व भावना आणखी जास्त दृढ करते की तुझे स्वतःचे शरीर देखील तुला साथ देत नाही तर मग पुत्र, मित्र, स्वजन ह्यांच्यात का मोहीत होतो ? ते सगळे अन्य आहेत. पुढे अशुचिभावना मानवाला मोहनिद्रेतून जागृत करते की ज्या शरीराच्या प्रती तुला इतकी आसक्ती आहे ते शरीर किती घृणित, मलीन आहे त्याचा तर तू विचार कर ! अशाप्रकारे प्रथम सहा भावनांचे