________________
होते. आत्म्यात अनंत शक्ती आहे. त्यांना प्रकट करणारे तप आहे.
लब्धी आणि सिद्धींचा उपयोग योगी अथवा तपस्वी असाधारण कारणाशिवाय करत नाही. कारण त्याचा उपयोग करणे प्रमादजन्य आहे. महत्त्वाचा विषय कर्म निर्जग करण्याचा आहे. कर्म निर्जरा तपाद्वारा होते व अचिंत्य आत्मशक्ती पण प्राप्त होते.
ही भावना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण सर्व दर्शनांचा अंतिम ध्येय मोक्ष आहे. मोक्ष ह्या भावनेच्या चिंतनाने आचरणाने प्राप्त होतो. मन, वचन, काया यांची एकाग्रता साधून जर तप केले तर देहध्यास सुटतो आणि ज्याचा देहध्यास सुटतो तो आपल्या ध्येयापर्यंत शीघ्रतेने पोहोचतो.
(७२८)
लोकभावना जीव कर्माच्या उदयाने अनादी काळापासून ह्या संसारात परिभ्रमण करत आहे. भ्रमण करणारे जीव कोणत्या कोणत्या स्थानात उत्पन्न होतात हे जागण्यासाठी लोक भावनेचे चिंतन केले जाते. लोक म्हणजे विश्व, जगत, इत्यादी. शब्दांचा एकच अर्थ आहे.
ह्या विशाल लोकामध्ये हा जीव वेगवेगळ्या जातीमध्ये अर्थात एकेन्द्रिय द्विइंद्रिय इत्यादी जातींमध्ये (इथे जातीचा अर्थ समूह होतो.) भ्रमण करून आला. ह्या जन्मात जे काही प्राप्त झाले आहे ते नवीन काहीच नाही, भूतकाळात अनंत वेळा अनंत स्वजन मिळाले, वैभव इत्यादी एकत्र केले. परंतु मृत्यू होताच ते सर्व काही सोडून जीव तेथून निघून गेला. त्यामुळे हे सर्व निरर्थक आहे, असे ज्ञान ह्या लोक भावनेच्या चिंतनाने प्राप्त होते.
ज्या जीवावर लोकभावनेच्या ह्या बोधाचा प्रभाव पडतो तो जीव विरागी झाल्याशिवाय रहात नाही. अशाप्रकारे ह्या भावनेचे विवेचन केले आहे.
बोधिदुर्लभ भावना लोकभावनेत विचारानंतर बोधिदुर्लभ भावनेत असे विचार आहेत की ह्या विशाल विश्वात अनंत काळापासून भ्रमण करणाऱ्या या जीवाला सर्व भाव अनंतवेळा मिळाले आहेत. पण एक भाव त्याला मिळाला नाही. तो म्हणजे बोधी बोधी म्हणजे सम्यग्दर्शन सम्यक्त्व समकित श्रद्धा हे सर्व एकार्थवाचक शब्द आहेत. बोधी प्राप्त होणे दुर्लभ आहे. त्याचा विचार करणे, बोधी दुर्भत भावना आहे.
दुर्लभ बोधी सुलभ कशी होऊ शकते त्याचे विवेचन ह्या भावनेत केले आहे. लोककल्याण आणि लोक मांगल्याच्या उत्तम ध्येयाने भावनेसंबधी तसेच भावनेच्या बारा प्रकारांविषयी सरळ, मधुर, प्रवाही शैलीत जे वर्णन केलेले आहे ते परम
-
3