________________
(७२६)
एकस्थान सोडून दुसऱ्या स्थानाला जातो.
म्हणजे आत्मा आत्माचे ज्ञान इत्यादी गुण आपले आहेत त्याशिवाय आपले काहीच नाही.
आत्मा ज्ञानमय आहे. त्याच्या ज्ञान गुणाला प्रकट करण्यासाठी ज्ञानावरणीय कर्माचा नाश केला पाहिजे आणि ज्ञानावरणीय कर्माचा नाश करण्यासाठी मोहनीय कर्म नष्ट केले पाहिजे. मोहनीय कर्म नष्ट करण्यासाठी संयमाची आराधना केली पाहिजे, असे केले तर मनुष्य भव सार्थक होतो.
अन्यत्वभावनेचे सतत चिंतन केले तर हा दुःखमय पंचम काळ पण जीवाला दुःखी करू शकत नाही. जो शरीर आणि आत्म्याला भिन्न समजतो त्याला परमात्म स्वरूपाची प्राप्ती होते.
अशुची भावना एकत्व व अन्यत्य भावनेमध्ये आत्मा आणि आनात्मा यांना पृथक समजण्याचा बोध दिला आहे. आत्मा ज्या शरीरात राहतो त्याचा त्याला मोह होतो. कारण दीर्घकाळापासून आत्मा ह्या शरीरात निवास करतो. म्हणून त्याचा मोह सुटत नाही. शरीर व आत्मा भिन्न आहे हे समजल्यावर सुद्धा शरीराबद्दलची प्रिती, स्नेह, आकर्षण कमी होत नाही. शरीराबद्दल आकर्षण असण्याचे कारण केवळ त्याचे बाह्य स्वरूप आहे. विशेष चिंतन केल्यावर त्याचे आंतरिक खरे स्वरूप किती घृणास्पद आहे हे समजते.
ज्या सौंदर्याचा गर्व करून प्राणी आपल्या आत्म्याला विसरून जातो त्या सौंदर्याखाली काय लपलेले आहे ? हे पाहाण्यास त्याला वेळ नाही. त्याच्या बुद्धीवर पडदा पडला आहे. तो दूर करण्यासाठी तसेच शरीराचे वास्तविक स्वरूप समजण्यासाठी अशुचि भावनेचे चिंतन करण्याचे प्रस्तुत भावनेत विवेचन केले आहे. निश्चयात्मक दृष्टीने शुचि - अशुचीचे वर्णन असे होते की ज्यांचे अंतरंग शुद्ध नाही त्याची बाह्य शुचिता केवल फसवणुक आहे. जसे गाढवाला तीर्थस्नान, कडू फळाला गुळाचा लेप, उजाड घराला तोरण, उपाशी माणसाच्या शरीरावर अन्नाचा लेप, मातीच्या फळाला रंगरंगोटी करणे ह्यासाठी बाह्य क्रिया आहेत. चांगले कर्म केल्यामुळे बाह्यजीवन शुद्ध व निर्मळ होते त्याचेच आंतरिक जीवन निष्कलंक होते. हृदय शुद्ध असेल तर संकल्पविकल्प मनात येतच नाहीत आणि ज्याच्या मनात विकल्पभाव येत नाही त्याचे मन दूषित होत नाही. ह्यालाच वास्तविक शुचिता
म्हणतात.
शरीराच्या अशुचीचे चिंतन केल्याने ममत्व दूर होते आणि म्हणूनच ह्या भावनेत