________________
(७२५)
अनादिकाळच्या कर्मांमुळे आहेत. जीवाचा परम एकत्वभाव नष्ट करणारे कर्मच आहेत. जर कर्म नष्ट झाले तर अनेकता राहणारच नाही. त्याची एकता नेहमीच अविच्छिन्न राहील.
मी एकटाच आहे असे चिंतन करणेही एकत्व भावना आहे. मोहामुळे जीव दुसऱ्यासाठी पाप करतो, पण तरी त्याचे फळ त्याला एकट्यालाचे भोगावे लागतात. मोहान्ध होऊन ह्या जीवाने अनंत भवात धन, शरीर स्वजन इत्यादींची चिंता केली. पण स्वतःची थोडीपण चिंता केली नाही. तो स्वतःलाच विसरला. त्याला एकत्व भावनेच्या चिंतनानेमी एकटा आहे असे चिंतन केले पाहिजे आणि जेव्हा एकत्वाची बुद्धी प्राप्त होते तेव्हाच जीव स्वतःचे हित साध्य करण्यासाठी तत्पर बनतो.
अन्यत्व भावना - शरीर इत्यादी वस्तू माझ्याहून अन्य आहेत. माझ्या नाहीत असे चिंतन करणे अन्यत्व भावना आहे. जी वस्तू स्वतःची नाही, तिला स्वतःची मानणे म्हणजे ममत्व आहे. कोणती वस्तू माझी नाही हे जाणण्यासाठी प्रथम स्वतःचे काय आहे हे जाणले पाहिजे. स्वतःचे काय आहे हे जाणण्यासाठी स्वतः कोण आहे हे जाणले पाहिजे.
निश्चय दृष्टीने 'मी शुद्ध आत्मा आहे, शुद्धज्ञानाशिवाय माझे काहीच नाही' असे चिंतन मोह नष्ट करण्याचे मोठे साधन आहे.
शरीर आणि आत्मा भिन्न आहेत. शरीर क्षणिक आहे तर आत्मा शाश्वत आहे. कर्मामुळे आत्म्याचा शरीराबरोबर संयोग झाला. परंतु हे शरीर माझे नाही तर त्याच्यावर ममत्व का करावे ? असे चिंतन अन्यत्वभावनेत केले आहे.
संसारच्या संबंधाचे भवन स्वार्थाच्या पायावरच उभे आहेत स्वार्थ पूर्ण होताच संबंध पूर्ण होतात.
अन्यत्वभावना आपल्याला बोध देते की स्वजन, धन तर जीवापासून भिन्न आहेच आहे, पण ज्याच्याबरोबर सर्वात घनिष्ट संबंध आहे असा शरीरपण जीवाहून अन्य आहे. कारण जीव चैतन्यमय आहे आणि शरीर जड आहे. जीव अरूपी, नित्य आहे, शरीर रूपी, अनित्य आहे.
अन्यत्व भावनेच्या चिंतनाने मी शरीरहून भिन्न आहे अशी प्रतीती झाली तर जीव दुःखाच्या प्रसंगी दुःखित होत नाही. मृत्यूने घाबरत नाही. कारण जीव अमर आहे. तो कधी मरत नाही. शरीराचा नाश होतो. तेव्हा अज्ञानी जीवाला मी पण मेलो असा भ्रम होतो. पण ज्ञानी व विवेकीजीव आत्म्याला शरीराहून भिन्न समजतात. हे शरीर जीवाला राहाण्याचा, आधार आहे. वेळ झाली की जीव एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात अथवा