________________
(७२७)
शरीराच्या अशुचीतेचे वर्णन वर्णन केले आहे. म्हणूनच म्हटले आहे - 'जगत्कायस्वभावी च संवेग वैराग्यार्थमः'१ संवेग आणि वैराग्यासाठी संसार आणि शरीराच्या स्वभावाचा विचार केला पाहिजे.
आस्रव भावना - हा संसार कर्म प्रवाहाच्या परिणामांचा विस्तार आहे. कर्म आपल्या प्रकृती व स्वरूपानुसार विविध फळे देतात जोपर्यंत त्यांचा प्रवाह गतिशील राहातो. संसारातील जन्म मरणाचेचक्र चालूच राहाते. जैन दर्शनात यालाच आस्रव म्हणतात. आस्रवामुळे आत्म्यात कर्म अणू प्रवेश करतात. नंतर ते कर्माणू आत्म्याबरोबर दूधपाण्याप्रमाणे एकरूप होतात त्याला कर्मेबंध म्हणतात. कर्मबंध झाल्यानंतर अमुक काळ पसार झाल्यावर त्या कर्माचा उदय होतो. कर्मोदय होतो तेव्हा कर्म स्वतःचे फळ देऊन आत्म्यापासून वेगळे होतात. कर्माच्या उदयामुळे जीव संसारात परिभ्रम करतात. अशाप्रकारे जीवाच्या संसार परिभ्रमणाचे कारण आस्रव आहे असे चिंतन करून आस्रव अर्थात पाप कर्म येण्याचे जे कारण आहे त्याचा त्याग करण्याचे विवेचन ह्या आस्रव भावनेत केले आहे.
संवर भावना - आरनवभावना संसारदुःखाचे मूळ आहे. त्या संसाराच्या दुःखाचा अंत आस्रवाच्या निरोधाशिवाय होणार नाही. म्हणून मोक्षसुखाचे इच्छुक आस्रव निरोध करण्याचा प्रयत्न करतात. आरनव निरोध म्हणजे संवर. आरनव निरोध केल्याने कर्मरूपी कचरा आत्म्यात प्रवेश करत नाही. संवरभावनेत आरनब निरोध करण्यासाठी काय केले पाहिजे ह्याचे विवेचन केले आहे.
निर्जरा भावना - सर्व कर्मांचा क्षय करण्यासाठी आस्रव निरोधरूप संवर आवश्यक आहे, त्याचप्रमाणे निर्जरापण अत्यंत जरूरी आहे. निर्जरा म्हणजे कर्माचा क्षय, संवराने नव्या कर्माचा बंध होत नाही आणि निर्जराने पूर्व बद्ध कर्माचा क्षय होतो. म्हणून आध्यात्मिक विकासासाठी संवर आणि निर्जरा दोन्ही आवश्यक आहेत. ह्या भावनेत बारा प्रकारच्या तपांचे वर्णन केले गेले आहे. कारण तप हे आत्मधर्म आहे. आत्म्याच्या विकासासाठी अत्यंत उपयोगी तत्त्व आहे. तप बाह्य आणि अंतरंग शत्रूच्या श्रेणिला पराजित करण्यासाठी समर्थ शस्त्ररूप आहे. त्याच्यामुळे वैभव, लब्धी आणि सिद्धी प्राप्त होते. तसेच स्वर्ग आणि मोक्षापर्यंत पोहोचवण्यात सक्षम असल्याने तप संपूर्ण जगाला पूज्य आहे. लब्धी म्हणजे जीव आपले रूप लहान-मोठे करू शकतो, अदृश्य होऊ शकतो. अश्या अनेक प्रकारच्या शक्तीला लब्धी म्हणतात. तसेच रोग, उपद्रव इत्यादींचा विनाश करण्याच्या शक्तीला सिद्धी म्हणतात. तपाच्या अचिन्त्य प्रभावाने अनंत शक्ती प्राप्त