________________
(७३८)
व्यवहार, विश्वमैत्री तथा आध्यात्मिक श्रेयाचा मार्ग स्वीकारण्यात जीवात्मा उद्यत होतो. प्रस्तुत प्रबंधाचा हाच निष्कर्ष आहे.
दैनंदिन जीवनात घडणाऱ्या विषमतापूर्ण, निर्दयता पूर्ण नितांत स्वार्थाधता पूर्ण घटना जेव्हा दृष्टिगोचर होतात तेव्हा कल्पना करणे अशक्य होते की मानवाने आपले जीवन संस्कारित, परिष्कृत केले नसते तर घोर अंधकार, नैराश्याचे अमिट धुके चोहोकडे पसरले असते. चरम चढूंच्या अंधत्वामुळे जितका विनाश झाला असता त्यापेक्षा आंतरिक चढूंच्या अंधत्वामुळे अधिका विनाश झाला असता.
अशा युगात लुप्त झालेल्या आध्यात्मयुक्त संस्कृतीला उदिप्त करणे अत्यावश्यक आहे. ज्याचे मूल्य फक्त भौतिक सुखात्मक पदार्थाच्या सत्तेवर आधारित नाही तर नैतिक चारित्रिक आणि आध्यात्मिक मूल्यावर आधिष्ठित आहे.
जगात व्यष्टी आणि समष्टी यांचा घनिष्ट संबंध आहे. व्यष्टी व्यक्ती समष्टीचा एक अंश आहे अशा व्यक्तीचा सापेक्ष समुदायच समष्टी आहे. या समवाय अथवा समूहाचा एक एक व्यक्तीरूप अंश विकृत अथवा दृषित झाले तर अविशिष्ट व्यक्तींवर फार प्रभाव पडतो. घड्याळाचा एखादा भाग बिघडला तर बाकी सर्व भाग चांगले असले तरी निष्क्रिय होतात. घड्याळ बंद पडते. घड्याळ अगदी व्यवस्थित चालण्यासाठी त्यातील सर्व भाग व्यवस्थित असले पाहिजेत. त्याचप्रमाणे व्यक्तीव्यक्तींच्यामध्ये सुधारणा करून एक असा अभियान करायला पाहिजे त्यात प्रत्येक व्यक्तीच्या अंतकरणात अशी भावना जागृत करायला पाहिजे की ऐहिक, भौतिक सुख आणि संपदा म्हणजे जीवन नव्हे. सत्य, नीती, सदाचार, समता इत्यादी गुण जे मानवाला-मानवतेच्या निकट आणतात. ते अर्जित करायला पाहिजे. करुणा, सेवा, सहृदयता इत्यादी सवृत्तींचा स्वीकार करायला पाहिजे.
___ मानवाला कार्याची प्रेरणा देणारे दोन पक्ष आहेत. हृदय आणि मस्तिष्क, हृदयाचा आधार भावना आहे, मस्तिष्काचा आधार बुद्धी आहे. भावना-श्रद्धेच्या आधारे गतिशील होते. जो हृदयाचा विषय आहे. बुद्धीचा आधार तर्क आहे. तर्क स्वार्थ युक्तपण असू शकतात. कारण बुद्धी प्रथम त्याला प्रयोजन पाहण्याची प्रेरणा देते. भावनेची शुष्कता किंवा -हासचा परिणाम व्यक्तीव्यक्तींमध्ये दूरत्व, स्नेहाचा अभाव, ईर्षा, प्रतिस्पर्धा आणि वैमनस्ययुक्त बुद्धी, आकाशाएवढी द्रव्यलोभाची असीम अभिलाषा प्रत्यक्ष दिसून येते.
बुद्धी नेहमीच तर्कबद्ध अथवा विनाशक नसते. जेव्हा ती भौतिक उपलब्धित लागते तेव्हा विनाशाचे रूप धारण करते. बुद्धी संतुलित असली पाहिजे. संतुलित बुद्धीने