________________
(७२९)
उपकारी आहे. अनेक साधक आत्म्याच्या जीवनामध्ये वैराग्याचा विकास होण्यासाठी, आणि ते संसाराने विरक्त होऊन मोक्षमार्गाचे साधक आणि आराधक बनावे, पाप प्रवृत्तीने निवृत्त होऊन पुण्य प्रवृत्तीमध्ये प्रगती करावी, असे सुंदर परम अध्यात्मरसाने युक्त लेखन अनेक महान चिंतकाच्या चिंतनाचा प्रसाद आहे. त्या चिंतनाच्या चांदणीचा प्रकाश संसारी जीवाच्या अज्ञान अंधकाराला दूर करून ज्ञानाचा प्रकाश करणारा आहे.
धर्मभावना - ह्या भावनेत साधक धर्मचिंतन करतो. साधकाची पूर्ण निष्ठा ही असते की धर्मच जीवनात सर्वोपरी आहे आणि जेव्हा धर्माच्या श्रेष्ठतेची त्याला समज येते तेव्हा धर्माचरण करण्याची भावना उत्पन्न होते. धर्म प्राणिमात्राच्या कल्याणासाठी आहे, हित आणि आत्मशांतीसाठी आहे, त्याचे प्रकार इत्यादींचे ह्या भावनेत वर्णन केले आहे.
धर्म भावनेच्या चिंतनाने ज्ञान होते की मानव जीवन तेजस्वी व उन्नत करण्यासाठी, संस्कार दृढ करण्यासाठी धर्मच सर्व श्रेष्ठ आहे. धर्माने मानवाचा, मानवतेचा, मानव आत्म्याचा विकास होतो.
ज्याला धर्माची रुची असते, त्याचे जीवन सार्थक असते. आंबा पिकल्यावर त्याचा रस आंब्यातच असतो. परंतु बाहेरून केशरी रंग दिसल्याशिवाय रहात नाही, त्याचप्रमाणे ज्याच्या हृदयात धर्म आहे तो बाहेर त्याच्या व्यवहारात, आचरणात दिसल्या शिवाय रहात नाही. धर्मभावना जीवनाला सदगुणांनी सुगंधित बनवते.
धर्म हृदयात घुसलेली दानवीय वृत्ती, स्वार्थ-लिप्सा काढून टाकतो आणि त्यात मानवतेची प्राणप्रतिष्ठा करतो. हृदयात धर्मरूपी सूर्याचा प्रकाश होताच अज्ञान, मोह, मद मत्सर इत्यादींचा अंधकार दूर होतो.
धर्ममंगल लक्ष्मीचे क्रीडास्थान आहे. धर्म जगाचे सार तत्व आहे, सर्व जीवनावर दयाभाव अभयभावना धर्म आहे. संपूर्ण भय दूर करणारा धर्म आहे. धर्म सिद्ध गतीची शिडी आहे. ज्याप्रमाणे शिडी चढण्यासाठी पायऱ्या असतात त्याप्रमाणे मोक्षात पोहोचण्यासाठी गुणस्थानक्रम आरोह आहे. अशाप्रकारे ह्या भावनेत विवेचन केले आहे. जे साधकाला उन्नत स्थानी पोहचविण्यासाठी सक्षम आहे.
आपल्या समोर धर्माचे दोन रूपे दिसून येतात. एक आचरणात्मक व दुसरे उपासनात्मक. आचरण म्हणजे जीवनचर्या आणि उपासना म्हणजे कर्मकाण्ड, आचरण प्रधान धर्माने अनैतिकता, अपराध, असमाजिकता कमी होते. परंतु आचरणाचे प्राधान्य