________________
aheidlalipala
s
RRIERASAJHamarhama
त्यांना दुःखरहित शाश्वत सुख प्राप्त होते. या क्षणभंगुर संसारात निर्वाणाला सोडून सर्व वस्तू विनाशशील आहेत.
___ वस्तूच्या अनित्यतेचा विचार करून, भौतिक वस्तूमध्ये मोह ठेवून सुख प्राप्त करण्याची इच्छा दूर करण्यासाठी अनित्य भावनेचे चिंतन केले जाते. ज्या वस्तूंच्या प्रती ममत्व आहे त्या वस्तूंचा वियोग होतो तेव्हा दुःख होते आणि ज्या वस्तूंच्या प्रती ममत्व नसते त्यांच्या वियोगाने मात्र दुःख होत नाही.
कन्या जन्म घेते तेव्हापासून मोठी होईपर्यंत कष्ट करून का होईना तिचे पालनपोषण केले जाते. तरी देखील योग्य वयात कन्येला दुसऱ्या घरी पाठवताना बॅण्डबाजे वाजवून तिला निरोप दिला जातो. कारण तिच्या जन्मापासूनच नक्की झालेले असते की ही कन्या आपल्याकडे राहणार नाही. एक दिवस तिला परक्या घरी पाठवावे लागेल. अशीच बुद्धी पर पदार्थांच्या प्रती झाली तर दुःख होणार नाही. हे सर्व भौतिक पदार्थ माझे नाहीत अशी बुद्धी होताच त्यांनापण वाजे वाजवून निरोप देण्याची इच्छा होईल.
पदार्थ आपण जर सोडले नाही तरी ते आपल्याला सोडणारच आहे. रडता रडता पण त्या पदार्थांना सोडावे लागेल. त्याच्यापेक्षा हसता हसता आपण स्वतःच त्यांचा त्याग का करू नये ? रडतारडता जो सोडतो तो बिचारा, आणि हसताहसता जो सोडतो तो बहादूर. जो हसता हसता स्वतः सोडतो तो बुद्धिमान आणि रडता रडता सोडतो तो बुद्धू.
अनित्य भावना आपल्याला बोधपाठ देते की सर्व प्रथम भौतिक वस्तूंच्या ममत्वाला सोडा. जो भौतिक वस्तूंच्या ममत्वाचा त्याग करतो तो आत्मसाधना बरोबर करू शकतो.
मनुष्यभवाचा सदुपयोग त्याग वैराग्याने होतो ‘देहस्य सारं व्रतधारणं च.' बुद्धीचा उपयोग तत्त्वविचारणेने होतो. 'बुद्धे फलं तत्त्व विचारणं च वाचः फलं प्रीतकरं नराणाम्' मधुर आणि हितकारक वचन बोलणे, अन्याना प्रियप्राप्त होणे हे वाणीचे फळ आहे. 'अर्थस्य सारं किल पात्रदानं' धनाचा फळ सुपात्रदान आहे. म्हणजे सुपात्रदान देणे धनाचा सदुपयोग आहे.
अनित्य भावनेच्या चिंतनाने दोन बोधपाठ मिळतात. एक बोध हा मिळतो की भौतिक वस्तू नाशवंत असल्याने त्यांच्या प्रती रागभाव, ममत्वभाव ठेऊ नये. आणि दुसरा बोध हा मिळतो की मिळालेल्या शक्तीचा नष्ट होण्यापूर्वीच सदुपयोग करणे हितावह आहे.
२) अशरणभावना - दुःखात भौतिक वस्तू अथवा स्वजन इत्यादी कोणी