________________
(७१९)
परिग्रह, क्रोध, मान, माया, लोभ ह्या नऊ अप्रशस्त भावनांचा उल्लेख केल्यानंतर बृहत्कल्यभाण्यामध्ये वर्णित कांदर्पि इत्यादी पाच अशुभ भावनांच्या पंचवीस प्रभेदांचे वर्णन प्राप्त होते. तसेच उत्तराध्ययन सूत्राच्या छत्तिसाव्या अध्ययनातपण ह्या भावनेचे वर्णन प्राप्त होते. उत्तराध्ययन आणि बृहत्कल्पभाप्यात वर्णित भावनांच्या निरूपणात खूपच साम्य आहे.
अकल्याणकारी अशुभ भावनेचे वर्णन ज्या ज्या ग्रंथात प्राप्त होते त्याचे विवेचन प्रस्तुत प्रकरणात वर्णित केले आहे.
प्रकरण ५ : 'आगमोत्तर काळच्या जैन साहित्यातील भावनेचे निरूपण'
जैन दर्शनात 'भावना' ह्या विषयावर विस्तृत विवेचन झाले आहे. जैन आगमची अर्धमागधी प्राकृत भाषा व आगमावर नियुक्ती, भाष्य टीका इत्यादी प्राकृत व संस्कृत भाषेत झालेल्या रचनांच्या शिवाय स्वतंत्र रूपात विविध सैद्धांतिक विषयावर प्राकृत, संस्कृत रचना होत राहिल्या. ज्ञान व आचारसंबंधी विविध अंग, उपांगांचे या साहित्यात सारगर्भित विवेचन झाले आहे. 'भावना', 'ज्ञान' आणि 'चर्या' यांची शृंखलाबद्ध रचना आहे. 'भावना' ज्ञानाला क्रियान्वित करण्याचे अनन्य साधन आहे. म्हणून जैन तत्त्व सिद्धांतामध्ये ह्या विषयाची विस्तृत चर्चा दिगंबर, श्वेतांबर मूर्तिपूजक, स्थानकवासी, तेरापंथी ह्या चारी फिरक्याचे आचार्य, मुनिराज, तसेच वर्तमान काळच्या काही श्रावक यांनी भावनेच्या विविध चिंतनबिंदूंना स्वतंत्र ग्रंथरूपात, लेखरूपात प्रकरणरूपात आणि दृष्टांत, कथांद्वारा गद्य, पद्य अथवा गद्य-पद्य शैलीत साधकाला समजवण्याचा ज्ञान देण्याचा जो श्रेष्ठ पुरुषार्थ केला आहे. त्याचे ह्या पाचव्या प्रकरणात वर्णन केले आहे.
भावनेचे अनेक प्रकार आहेत. जसे तिसऱ्या प्रकरणात वर्णित पाच महाव्रताच्या पंचवीस भावना. चौथ्या प्रकरणात वर्णित पाच अव्रत चार कषायाच्या मिळून नऊ आणि कांदपक इत्यादी, पाच अशुभ भावनेचे पंचवीस भेद अर्थात २५ +९=२४ अशुभ भावना. अनित्यादी बारा वैराग्य भावना, मैत्री इत्यादी चार योग भावना. जिनकल्पी भावना ज्याचे वर्णन आगमातील भावनेच्या तिसऱ्या प्रकरणात झाले आहे, षोडशकारण भावना अश्या प्रकारे अशुभ, शुभ आणि शुद्ध भावनांचे अनेक प्रकार आहेत. भावनेच्या संख्येला स्पष्टपणे सांगता येणार नाही. कारण जितके मनाचे भाव विचारतरंग तितक्या भावनेचे रूप घेऊ
,
शकतात. परंतु जैन दर्शनात सर्वाधिक प्रसिद्ध अनित्यादि बारा भावना आहेत, त्याचे वर्णन प्रस्तुत प्रकरणात केले आहे.