________________
माया, इत्यादींपासून दूर राहातात. ज्ञानाची समग्र ज्योती त्यांना उपलब्ध असते. ते निरपेक्ष रूपात तत्त्वदर्शी असतात, त्यांची वचने त्रिकालबाधित सत्य असतात. ते भूत, वर्तमान आणि भविष्यवर्ती समस्त पदार्थांचे तसेच भावांचे सम्यक व्याख्यान करतात. ते आगम शब्दांद्वारा वाच्य आहेत. आगम त्या ज्ञान-विज्ञानाचा अजस्त्र स्रोत आहे, ज्याचे मूलक अनादी काळापासून प्रवाहित आहेत. त्याचा प्रत्येक युगात महापुरुष आख्यान करतात.
जैन धर्म आणि दर्शन यांचा मूळ आधार आगम आहेत. आगमाच्या रूपात आपल्याला एक अत्यंत महत्त्वपूर्ण वाङ्मयनिधी प्राप्त आहे. भगवान महावीराद्वारा प्रतिपादित हे उच्चतर, उत्कृष्टतम साहित्य आहे, ज्यात सर्वांचे हित समाविष्ट आहे. हिताची दोन रूपे आहेत- प्रेयस आणि श्रेयस. लौकिक हितास प्रेयस म्हटले जाते आणि अलौकिक हितास श्रेयस म्हटले जाते. आगमाच्या महासागरात यथाशक्ती अवगाहन निमज्जन करून भावनेचे विविध तत्त्वात्मक, वैविध्यपूर्ण तत्त्वांचे समीकरण करण्याचा या प्रकरणात मी प्रयत्न केला आहे.
आगमांचा सागर तर अथांग आहे, त्यात असलेले ज्ञानरत्नेसुद्धा असीम आहेत. आपली ससीम शक्ती आणि सामर्थ्याद्वारा जितके आणि जे जे प्राप्त केले त्याचे यथास्थान वर्णन करण्याचा मी विनम्र प्रयत्न केला आहे.
जैन आगमग्रंथात सर्वाधिक श्रद्धेय आणि भाषेच्या दृष्टीने सर्वाधिक प्राचीन आगम आचारांग आहे. आचारांग शब्दानेच विदित होते की प्रस्तुत ग्रंथात आचारसंहितेचे वर्णन असेल. त्या अनुसार ह्या ग्रंथात साधूच्या आचाराचे अत्यंत वैज्ञानिक सूक्ष्म आणि विस्तृत आलेखन प्राप्त होते. साधू-साध्वींना आचरण करण्याच्या पाच महाव्रतांची सूक्ष्म चर्चा आचारांग सूत्राच्या भावना' नामक अध्ययनात प्राप्त होते. आगमाच्या ह्या प्रथम अंग सूत्रातच 'भावना' शब्द उपलब्ध होतो. प्रत्येक महाव्रताच्या पाच-पाच भावना, अशा एकंदर पंचवीस (२५) भावनांचे अत्यंत सरळ निरूपण आचारांग सूत्रात प्राप्त होते.
आचारांग सूत्रानंतर समवायांग सूत्र, प्रश्नव्याकरण सूत्र इ. आगमात पण ह्या भावनेचे कोठे संक्षिप्त तर कोठे विस्तृत विवेचन प्राप्त होते. ह्या भावना साधूच्या महाव्रताला दृढ बनवण्यासाठी अती उत्कृष्ट आहेत.
___ अन्य आगम ग्रंथांत पण अनित्यादी बारा भावना तसेच मैत्री इत्यादी चार योग भावनांचा उल्लेख व कोठे कोठे विस्तृत विवेचनपण प्राप्त होते. उत्तराध्ययन सूत्रात प्रशस्त अथवा शुभ भावनेचे थोडक्यात वर्णन प्राप्त होते आणि अप्रशस्त भावनेचे आलेखन