________________
( ७१६ )
अनवरत चालत राहून ध्येयाप्रद पोहोचतो. हा महिमा भावनेचा आहे. त्याच्यामुळे साधक हिंमत हारत नाही. धर्मआराधनेत भावना जीवन जगण्याची, उन्नत्ती करण्याची शक्ती देण्याचे कार्य करते.
प्रत्येक मानवात शुभ आणि अशुभ भावनेचा संघर्ष सतत चालतच असतो. व्यक्तीचा पुरुषार्थ उणा पडता कामा नये. पुरुषार्थ उत्तम असला पाहिजे. म्हणजे त्याने उत्तरोत्तर अशुभ भावनेने मुक्त होऊन शुभ भावनेकडे आणि शुभ भावनेपासून शुद्ध भावनेकडे प्रगती केली पाहिजे. भावनेच्या क्षेत्रात सम्यक पुरुषार्थ महान उपकारक ठरेल.
ह्या दुसऱ्या प्रकरणात जैन धर्माच्या अनेक आचार्य, विद्वानांनी भाव आणि भावनेची भिन्नता, भावनेची व्याख्या आणि मानवीय जागृतीद्वारा उत्तम भावनेचे कसे चिंतन केले पाहिजे, भावनेचे लक्षण, स्वरूप, विस्तार, विवेचन इत्यादी कसे केले आहे याचा संक्षिप्त परिचय दिला आहे. त्याचे पुढच्या प्रकरणात विश्लेषणात्मक परिशीलनाच्या रूपात आहे.
जैनाचार्यांच्या मते “भावना भवनाशिनी" आहे ह्या भावनेची मूळ संख्या बारा आणि चार योगभावना मिळून एकूण सोळा भावना प्रसिद्ध आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय देण्याचा प्रयत्न या प्रकरणात केला आहे.
जैन धर्मात भावनेचे खूपच महत्त्व आहे. अनेक ज्ञानी पुरुषांनी भावनेला अजरअमर रूपात स्थिर होण्याचे अनन्यतम साधन सांगितले आहे. भावनेमध्ये जीवला शिव, आत्म्याला परमात्मा बनविण्याची महानशक्ती आहे. स्वाध्याय हे जीवाचे भोजन आहे तर भावना त्या भोजनाचा स्वाद आहे. इतके भावनेचे महत्त्व आहे.
प्रकरण ३ : 'अर्धमागधि आगमात भावनेचे विवेचन' -
तिसऱ्या प्रकरणात जैन आगम ग्रंथातात भावनेचे जे विवेचन झाले आहे त्याचे थोडक्यात वर्णन केले आहे. विद्वानांनी शास्त्रांना दिव्य चक्षू म्हटले आहे. चर्मचक्षुद्वारा आपण जगातील त्या पदार्थांना पाहू शकतो, जे स्थूल आहेत. ज्यांना आपल्या नेत्रांनी पाहू शकत नाही. पण त्यांचे आस्तित्व मात्र निश्चित आहेच. त्याचा आपण शाखाच्या माध्यमाने अनुभव करू शकतो. 'शास्तीति इति शास्त्रम्' जो शासित करतो, विवेकपूर्वक पदार्थ आणि भाव प्राप्त करण्याचा मार्ग दाखवतो ते शास्त्र शास्त्रातही त्या रचनेचे सर्वाधिक महत्त्व त्यांना आहे, जे आप्तपुरुषांद्वारा प्रतिपादित आहेत. आप्तपुरुष राग, द्वेष, मोह,