________________
प्रकरणात दर्शविले आहे. भगवान महावीरांचा उपदेश आणि श्रुत परंपरा ह्या विषयावरपण आलेखन प्रस्तुत केले आहे. जैनधर्म ग्रंथ, आगम, आगम साहित्याच्या तीन वाचना, त्याचे विभाजन, वर्गीकरण आणि बत्तीस आगमांचे वर्णन यात केले आहे.
जैन धर्माचे मुख्य सिद्धांत आणि भगवान महावीरांच्या वाणीचे आगम ग्रंथात गणधर भगवंतांनी जे उत्तम प्रकारे संकलन केले आहे ते जैन धर्माला समजण्यासाठी अनिवार्य आहे. भगवान महावीरांचा उपदेश आगमाच्या पानापानातच नाहीत शब्दाशब्दात गुंफलेला आहे. त्यामुळे आगम ग्रंथाचे जैन समाजावर महान उपकार आहेच. विश्वाच्या आध्यात्मिक क्षेत्रात पण याचे अद्भूत अर्पण आहे. जैन धर्माला समग्रपणे समजण्यासाठी आगम ग्रंथांच्या अभ्यासाची नितांत आवश्यकता आहे. म्हणूनच प्रस्तुत प्रकरणात श्रमण संस्कृती त्याची विशेषता आणि आगमग्रंथाचा परिचयात्मक विवरण देण्याचा मी विनम्र प्रयत्न केला आहे.
प्रकरण २ : 'भावनेचा आशय महत्त्व आणि थोडक्यात परिचय'
या पृथ्वी वरच्या मानवाला प्राप्त झालेल्या काही विशिष्ट संपत्तीमध्ये 'मन' एक महान संपत्ती आहे. शास्त्रकारांनी आणि ज्ञानी महापुरुषांनी सांगितले आहे की मन हेच मानवाच्या बंध आणि मोक्षाचे कारण आहे. मानवाच्या मनात विचाराचे सनातन चक्र फिरतच राहाते. आधुनिक मनोवैज्ञानिक पण मानवाच्या कित्येक मनोवृत्तींचा स्वीकार केला आहे आणि त्याचे शुभ व अशुभ अशा दोन मुख्य विभागात वर्गीकरण केले आहे.
भाव किंवा भावनेचा कार्याच्या निष्पत्तीमध्ये फार महत्त्वाचा वाटा आहे. धर्मरूप मंगल, उत्कृष्ट, उज्ज्वल, उत्तम कार्य म्हणजे धार्मिक व्रत, आत्मउपासनेचे उपक्रम शम, संवेद, निर्वेद आणि संयम. ह्या सर्वांची निष्पत्ती भावनेच्या अभ्यासाशिवाय होणे शक्य नाही. ज्याप्रमाणे कृषिउद्योगात जल-सिंचन परमावश्यक आहे त्याची पाऊसाच्या पाण्याने, कालव्याच्या पाण्याने, विहिरीच्या पाण्याने परिपूर्तता केली जाते त्याचप्रमाणे धर्माच्या पिकासाठी भावात्मक जल-सिंचन अपेक्षित आहे. भावनेने अनुप्राणीत होऊनच व्यक्ती धर्माच्या मार्गावर अग्रेसर होऊ शकतो.
धर्माचा मार्ग कंटकाकीर्ण आहे असे म्हटले जाते. अशा मार्गावर चालणे कठीण आहे. तसेच धर्ममार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला पावलोपावली येणाऱ्या विघ्नांना, संकटांना, उपसर्गांना सहन करावे लागते. हा विषय अंतरद्वंदात्मक आहे, आंतरिक युद्ध आहे. अशा स्थितीत धर्ममार्गावर आरूढ पथिकाला 'भावना' आधार देते. त्याच्या आधारे साधक