________________
प्रकरण आठवे उपसंहार
विस्तृत रूपात विवेचन तसेच व्याख्यान विचार आणि भाव यांचा सार संक्षेप किंवा नवनीत रूपात प्रस्तुतिकरण तसेच तद्विषयक आवश्यक संसूचनांचे संयोजन उपसंहार आहे.
व्यापक रूपात प्रतिपादित तत्त्व स्वायत्त केले जाऊ शकतात. जैन शास्त्रात सूचित विस्तार रूची आणि संक्षेप रूचिसंज्ञक व्याख्या क्रमात उपसंहार संक्षेप रूचित समाहित आहे.
प्रस्तुत शोधग्रंथाचा विषय “जैनदर्शनात 'भावना योग' याचे समीक्षात्मक विश्लेषण" आहे. ज्यात जैन दर्शनाच्या माध्यमाने भावनेशी संबंधित समीक्षात्मक अध्ययन प्रस्तुत केले आहे. उपसंहारात्मक दृष्टीने पर्यावलोकन या प्रकरणात केले आहे.
हे जग वैविध्यपूर्ण आहे. केवळ शरीर आकृती, राहाणीकरनी तथा रंग, रूप, वेश, भाषा इत्यादी रूपातच नाही, भावनात्मक दृष्टीने सुद्धा जनजीवनात विभिन्नता आहे. त्या भिन्नतेमध्ये शुभ भावनेचे जसे विविध भेद अथवा अवस्था असतात, त्याचप्रमाणे अशुभभावनेची पण भिन्न भिन्न स्थिती असते. कित्येक प्रकारच्या व्यक्ती अशा आहेत की कोणाच्यामध्ये शुभभावनेची प्रधानता आहे. त्याच्या तारतम्यानुसार क्रमशः उच्च, उच्चतर व उच्चतम गुणयुक्त पुरुष दृष्टिगोचर होतात. जिथे अशुभभावनेची प्रधानता असते तिथे हिंसा, असत्य, क्रोध, मान, इर्षा, द्वेष, इत्यादी असतात. विविध प्रकारच्या लोकांमध्ये राहून पण अशुभापासून शुभ आणि शुभामधून पण शुद्धत्वाच्या दिशेने साधकाची वाटचाल भावनेद्वारा कशाप्रकारे होऊ शकते त्याचे विवेचन करण्याचा प्रस्तुत शोधप्रबंधात अल्पसा प्रयत्न केला आहे.
अशुभभावना अथवा अशुभ कार्यासाठी कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाची गरज नसते. त्याच्यासाठी कोणतीही शाळा अथवा विद्यापीठे नाहीत. वाईट भावधारा अथवा वाईट काम लोक समाजातील विखुरलेल्या वाईट लोकांच्या अनुकरणाने आणि तशा सवयींमुळे स्वतःच शिकतात.