________________
(६९२)
प्रतिपादित निर्जरचा हा सूत्र ह्याचा सूचक आहे. तप त्यालाच म्हणतात जो तापवतो, परितप्त करतो. जो आत्म्याला परितत्प करतो तो कर्मबंधनाने उद्वेलित होतो. असे उद्वेलन कल्याणकारी अथवा श्रेयस्कर कसे होऊ शकते हा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाला घेऊन सुप्रसिद्ध दार्शनिक आणि नैयायिक धर्मकीर्तीनी जैनांद्वारा स्वीकृत तपसाधनेवर कठोर शब्दात आघात केला आहे. त्यांचा एक श्लोक फार प्रसिद्ध आहे. ज्यास सुप्रसिद्ध लेखक राहुल सांकृत्यायन यांनी आपल्या "दर्शन दिग्दर्शन" पुस्तकात उद्धृत केला आहे. ॐ वेद प्रामाण्यं कस्यापित् कर्तृत्वादः स्नाने धर्मेच्छा जातिवादावलेपः ।
सन्तापारंभः पापहानाय चेति, ध्वस्त प्रज्ञाणां पंच चिह्नानि जाड्ये ॥
१) वेदच प्रमाण आहेत. २) या जगाचा कोणी कर्ता नाही. ३) स्नानादी बाह्य शुद्धीने धर्म होतो. ४) जन्माश्रित जातिवाद तथ्य आहे. ५) जे गर्वपूर्वक असे मानतात की, पाप मिटविण्यासाठी त-हेत-हेचे तपाचरणाने संताप सहन करावेत-त्यांची बुद्धी ध्वस्त झालेली आहे. त्यांच्या जडतेचे ही पाच चिन्हे आहेत. अर्थात या पाच गोष्टी मानणारे अत्यंत जड आणि मूर्ख आहेत.
वरील पाच गोष्टीपैकी चार गोष्टी वैदिक धर्माला लागू होतात. पाचवी गोप्ट धर्मकीर्तीनी जैन धर्माला उद्देश्यून म्हटली आहे. त्याचे विश्लेषण करणे इथे आवश्यक आहे.
या संदर्भात नाथपरंपरेतील सुप्रसिद्ध योगी भर्तृहरी जे अगोदर उज्जैनचे सम्राट होते, त्यांचा श्लोक मननीय आहे.
भोगान भुक्ता वयमेव भुक्ता, तपो न तप्ता वयमेव तपताः ।
कालो न यातो वयमेव याताः तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा ॥
अर्थात- आपण भोगांना भोगत नाही तर भोगांनी आपल्याला भोगले आहे. आपण तप नाही तपलो, तपाने आपल्याला तापविले. वेळ (काळ) नाही व्यतीत झाला. आपणच व्यतीत होत आहोत.
तृष्णा जीर्ण, वृद्ध, जुनी नाही झाली. आपण जीर्ण शीर्ण झालोत. धर्मकीर्तीनी तपाला संताप म्हटले आहे. इथे आता त्याची चर्चा योग्य होणार नाही. जैन दर्शनात तपाचे शुद्ध मार्मिक विश्लेषण आहे. कदाचित त्याकडे त्यांचे लक्ष गेले नसेल. तेव्हा साधकास भेदज्ञानाचे विशेष ज्ञान प्राप्त होते. आत्मा भिन्न आणि शरीर भिन्न आहे. शरीराला होणारे कष्ट किंवा यातना ह्या आत्म्याला होत नाहीत. हे वरून शब्दाने बोलण्याने नव्हे तर आंतरिक दृष्टीने तसे वाटले पाहिजे. तेव्हाच त्याचे आत्मपरिणाम इतके उच्च