________________
(६९९)
"अनुभूती ज्ञानविभूति" असे महापुरुषांचे वक्तव्यांनी हेच प्रतिफलित होते. फक्त प्रलंबित चर्चा करण्याने नाही.
'वादे वादे जायते तत्त्वबोधः' वाद, चर्चा, वार्ता, विचार-विमर्श इने तत्त्ववोध होतो. विद्वज्जगतात हे सूत्र फार प्रसिद्ध आहे. हे खरे आहे की विचार-विमशनि तत्त्वबोध होतो. परंतु तत्त्वबोधाचा पुढचा क्रम आहे. जीवनात त्या तत्त्वांना क्रियान्वित करणे. अर्थात त्याप्रमाणे सुसंस्कारमय जीवन असायला हवे तदनुरूप क्रियाशीलतामध्ये संलग्न रहायता हवे तेव्हाच ते तत्त्वज्ञान आध्यात्मिक रसानुभूती देऊ शकेल. हाच अनुभवरस आहे. आध्यात्मिक आनंद आहे. परंतु ते साधनेच्या पथावर चालण्यानेच प्राप्त होऊ शकतो. आध्यात्मिक ज्ञानात तर किती पुरुषार्थ करायला हवा. जप, तप, ध्यान, संयम, व्रत, नियम, प्रत्याख्यान इ. चे महत्त्व समजून आकलन करायला पाहिजे.
ज्या महान आचार्य आणि ज्ञानी लोकांनी या संबंधी जे प्रबोधन केले. साधनेचे वेगवेगळे मार्गदर्शविले. त्याचा सांगोपांग सम्यक् अध्ययन न करता केवळ चर्चाच करीत राहिलो तर काय त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकू ? आपल्याला त्याचे अध्ययन करायला पाहिजे. मनन, चिंतन करायला पाहिजे..
आपल्या जीवनात विचार, अनुभवाचे महत्त्व अवश्य आहे. परंतु चिकालीन साधनेच्या परिणामस्वरूप महापुरुषांनी गहन गंभीर सर्वग्राही चिंतनाद्वारा जे अनुभव अमृत संचय केले आहे, त्यांचा उपयोग होऊन आपले चिंतन वाढवून त्याप्रमाणे अनुसरण केले तर श्रेयस्कर होईल. एकांगी विचाराने आग्रहाची वृत्ती वाढीस लागते. आग्रह वाढला की सत्य बाधित होते. अनाग्रहाने जिज्ञासा बलवत्तर बनते. जिज्ञासामध्ये उत्तरोत्तर अनुसंधान आणि शोध यांना वाव असतो. सत्य तर आपल्या रूपात अवस्थित असतेच. त्याला स्वायत्त करण्याचा आपला विधिक्रम आहे. म्हणून शास्त्रांद्वारे निर्देशित मार्गाला महत्त्व द्यायला पाहिजे. त्याचे अनुकरण करायला पाहिजे. सत्याला जीवनात क्रियान्वित करणे म्हणजे चारित्राराधना आहे. क्रियान्वयाच्या विधिनिषेध ग्रहण त्याग, आदान-प्रत्याख्यान इ. ची सर्वथा अपरिहार्यता आहे.
वरील विवेचनाचा निष्कर्ष असा आहे की साधकाने आपल्या साधनेची भूमिकेच्या अनुरूप धर्ममूलक आचार आणि क्रिया-प्रक्रिया इ. चा स्वीकार करणे आवश्यकच नाही तर अत्यावश्यक आहे. कारण की, परमलक्ष्य शुद्धात्म भावाची सिद्धी किंवा परमात्म भावाची प्राप्तीमध्ये यांची अनन्य उपयोगिता आहे.