________________
FONTS
शुद्धात्मभावनेला धारण करणारा स्वतः शुभाशुभ उपयोगाने मुक्त होतो. आत्म्याचे विशुद्ध रूप वर्णातीत, निराकार, निर्विकार, निरामय आहे. त्यात तल्लीन होतो. समत्व भावनेने जगाला पाहता पाहता स्वतःच्याच शुद्धात्म स्वरूपात लीन हा आत्मा शुद्ध होतो, आणि जेव्हा शुद्ध होतो तेव्हा साधक जीवनमुक्त दशेला प्राप्त होतो. शुभाशुभ भाव रहात नाही तेव्हा जीवात्मा सिद्धात्म्याच्या सुखाचा इथेच वर्तमानात चांगल्याप्रकारे अनुभव घेतो.
____ अशुद्ध भावनेने संसार आणि शुद्धभावनेने मुक्ती आहे. ह्याच्यावरून हे स्पष्ट होते की आत्म्याद्वाराचा आत्म्याचा उद्धार होतो.
जो आत्मभावनेत तल्लीन असतो त्याला निंदेत शोक होत नाही आणि स्तुतीत गर्व येत नाही. नावारूपात मोह होत नाही. त्याला सर्वत्र समाधीच असते.
शुद्धआत्मभावना कोटी कोटी तप, यज्ञ, तीर्थयात्रा इत्यादी क्रियेपेक्षा पण श्रेष्ठ आहे. शुद्धभावनेवाला प्रत्येक धर्मकार्य भावसहित करतो आणि दया, दान इत्यादीने पण कर्माची निर्जरा करतो.
म्हणून अशुभ भावनेला समजून शुभ भावनेच्या मार्गाने शुद्धात्म भावनेचे चिंतन मनन केले तर आत्मा शुद्ध होतो आणि सिद्ध गतीला प्राप्त करतो. मनुष्याचे जे अंतिम ध्येय मोक्ष आहे त्या ध्येयाला प्राप्त होतो.