________________
प्रत्याख्यानात, उपवास इ. तप करण्यात लागलेले असतात. आत्मज्ञानाशिवाय, शुद्धात्मभाव याचा साक्षात्कार झाल्याशिवाय यांच्या मोक्ष आराधनेला काय महत्त्व आहे ? हे तर सर्व शुभोपयोग मूलक कर्म व्यापार आहेत. ज्याच्यामुळे फार तर स्वर्ग मिळेल. या पलीकडे काही नाही. स्वर्ग प्राप्ती हे काय जीवनाचे ध्येय आहे ? लौकिक ऋद्धी, समृद्धी, वैभव, संपत्ती आणि सुख एवढेच पुरे आहे ? अशाप्रकारची चर्चा करीत असतात.
___ काही लोकांची अशी मान्यता आहे की, तत्त्वचर्चा केल्याने ज्ञान उत्पन्न होते. आणि जर अशाने आत्मज्ञान होते तर मग बाह्य क्रिया करण्याची काय आवश्यकता आहे? चिंतन करणारे असा विचार करीत नाहीत की ते जे बोलत आहेत ती भूमिका केव्हाची आहे ? साधनेचा एक वैज्ञानिक क्रम आहे. प्रथम जीवनातून अशुभाचे निष्कासन करायला हवे. जीवनात शुद्ध भाव अनायास कसा निर्माण होईल ? जोपर्यंत गृहस्थावस्थेत आहोत तोपर्यंत जीवनात शुभाशुभात्मक योग प्रवृत्त होतच असतात. म्हणून गृहस्थावस्थेतील साधकाला सर्वात प्रथम आपल्या जीवनातील अशुभयोगात्मक प्रवृत्तींना दूर करण्याची साधना करायला हवी. त्याचे जीवन सर्वथा निष्पाप, निर्मल, निर्वध्य आणि निर्दोष व्हायला पाहिजे. जीवनाचा असा परिष्कार संस्कार त्याला सद्प्रवृत्तींशी जोडेल. सत्प्रवृत्तींमध्ये सुद्धा तो आसक्त होणार नाही. पुढे प्रगती करता-करता तो इतका अनासक्त होऊन जाईल की "व्यवहार, व्यवहारासाठीच आहे. माझ्या आत्म्यासाठी नाही.' अशा परिणामाची धारा इतकी उच्च कोटीपर्यंत पोहोचेल तेव्हा परमावस्था प्राप्त होईल. मग गृहरस्थावस्थेतही उत्कृष्ट साधना मार्गावर आरूढ होईल. ही इतकी परमकोटीची अवस्था जेव्हा जीवनात प्राप्त होते ते मुखता तेव्हा स्वभावोन्मुखता व्याप्त होते, स्वभाव व विभावाचे भेदज्ञान प्राप्त होते मग असा विचार, चिंतन, मनन करण्याचा तथा बोलण्याचा त्यास अधिकार आहे.
वरील रूपात तत्त्वचर्चाशील पुरुषाने थोडे आत्मावलोकन करावे की, काय त्यांनी अशाप्रकारच्या उच्चकोटीच्या भूमिकेला स्पर्श केला आहे ? त्यांनी घर परिवार, लौकिकदृष्टा याचा त्याग केला आहे ? जेव्हा या सर्व गोष्टी आत्मसात केल्या जातात, त्या आकांक्षाचा त्याग केला जातो तेव्हा जीवनाला वेगळेच वळण लागते. जीवनधाराच बदलून जाते. मग आनंदघनजी, देवचंद्रजी सारख्या अध्यात्मयोगीसारखी अवस्था प्राप्त होते. त्यांच्याप्रमाणे सहज भावापन्न, शुद्धभावात स्थित महापुरुष असे बोलू शकतात. आणि ते जे बोलले आहेत ते आपल्या सर्वांसाठी प्रेरणा देणारे आहे. परंतु फक्त उच्चकोटीच्या आत्मज्ञानाची चर्चा केल्याने आणि व्यावहारिक जीवनात विरक्त अवस्था नसेल तर त्या फक्त बोलण्याने