________________
परंतु या व्यवहाराच्या मुळाशी परमसत्य-मोक्ष हेच खरे कारण आहे. बाह्य वेश वगैरे अनावश्यक नाहीत. कारण तो प्रशस्त पथ आहे. जो आपल्या ध्येयाप्रत पोहोचवतो. प्रत्यक्षपणे हे व्यावहारिक असेल तरी सफल विधिक्रम आहे. आचार्य पूज्यपाद समाधी शतकामध्ये आत्मभावना संबंधी लिहितात
अव्रतानि परित्यञ्य व्रतेषु परिनिष्ठितः ।
त्यजेन्तान्यपि सम्प्राप्य परमपदमात्मनः ||८४|| अव्रतांचा परित्याग करून व्रतामध्ये परिनिष्ट होऊन साधक आत्म्याच्या परमपदाला प्राप्त करण्यासाठी शुद्ध स्वरूपाची अनुभूती प्राप्त करून, शुद्धोपयोगात स्थिर होऊन मग व्यावहारिक व्रतांचा त्याग करू शकतो.
आचार्य पूज्यपादांनी इथे अव्रत-व्रत तथा आत्माचे परमपद या शुद्धस्वरूप या तीन मुद्दयांची व्याख्या केली आहे. त्यांनी प्रथम अव्रतांना सोडण्याचे विधान केले आहे. म्हणजेच साधकाचे व्रतरहित जीवन नसावे. व्रतांचे पालन करायलाच हवे. साधनामार्गावर पुढे-पुढे जाऊन त्या साधनेत इतक्या उच्चस्थानी जावे की स्वयमेव त्याला आत्मस्वरूपाची अनुभूती व्हावी. त्याला शुद्धोपयोगावस्थाचा साक्षात्कार व्हावा. तेव्हा कुठे व्यावहारिक दृष्टीने व्रत गौण होऊन जातात. कारण त्याचे समग्र जीवनच व्रतमय होऊन जाते. व्रतांचे प्रयत्नपूर्वक पालन करावे लागत होते ते आता त्याचे स्वाभाविकपणे पालन होते. किंचित मात्र सुद्धा अव्रत रहातच नाहीत. मूलतः व्रतांचा अर्थच हा आहे की स्वभावात राहणे. परंतु अव्रत परभावावस्था आहे. म्हणून शुद्धोपयोगात्मक स्थितीत व्रत नसतात असे म्हणू शकत नाही. व्रताद्वारे ज्यांच्या त्याग केला जातो ते परित्यक्त भाव स्वभावत: त्यापासून दूर होऊन जातात. म्हणून व्रतांना सोडण्यासंबंधी जे सांगितले जाते ते सुद्धा व्यावहारिक आहे. निश्चयात पोहोचल्यावर व्यवहार तर आपोआप सटतो. सोडावा लागत नाही. मग तेथे व्रत घेणे, पाळणे, सोडणे हे विकल्प असूच शकत नाहीत. त्या अवस्थेत व्रतामुळे लाभान्वित आत्मा आत्मिक उज्ज्वलता आणि शुद्धता सदा सर्वदा साठी झालेली असते.
अव्रती व्रतमादाय व्रती ज्ञानपरायणः ।
परातज्ञानसम्पनः स्वमेव परो भवेत् ।।८६।। व्रतरहित व्यक्ती अर्थात ती व्यक्ती जिने लौकिक दृष्टीने व्रत नाही घेतले. सावध अव्रताचे प्रत्याख्यान केले नाही. त्याने व्रत स्वीकारावे. पुनश्च ज्ञानाची आराधना करावी, जेव्हा त्याला आत्म्याचे परमज्ञान होते तेव्हा तो परमात्म अवस्था प्राप्त करतो. या