________________
(६९४)
की, पुण्याचे फळ तर पाहिजे त्याचा उपयोगही करायचा. प्रश्न असा पडतो की पुण्य तर भोगायचे आणि त्यापासून विरक्तही रहायचे हे कसे ?
स्वानुभूतीचे गाणं गायल्याने काही स्वानुभूती होऊ शकत नाही. स्वानुभूती तर आत्म्याची निराकुल कषायविहीन व चारित्र गुणाची शुद्ध अवस्था असली तर होते.
धर्मात रममाण झालेला आत्मा जर शुद्धोपयोग युक्त असेल तर मोक्ष प्राप्त करती म्हणून दया, दान, पुण्य व्रत, इत्यादि आचरणाचे ही महत्त्वपूर्ण स्थान आहे.
अनेकांना दृष्टीने व्रत इ. संबंधी चिंतन करताना सर्वात प्रथम साधकाच्या भूमिकेचे विचार करायला हवी. संसारात सर्व लोक एक सारखे नसतात. धार्मिकलोक किंवा साधकवृन्द सुद्धा आत्म- शक्ती, पुरुषार्थ, पराक्रम इत्यादी दृष्टीने भिन्न-भिन्न असतात. आ. कुन्दकुन्द इत्यादींनी साधकांना उद्देशून नैश्चयिक दृष्टीने जे विवेचन केले आहे ते यथार्थ आहे, सर्वमान्य आहे, अशा भूमिकेत पोहोचलेले साधकांसाठी हेच करणीय आहे... आ. कुन्दकुन्द म्हणतात, ही शुद्धोपयोममय भूमिका दुप्प्राप्य तर नाही. परंतु दुर्लभ अवश्य आहे. त्यासाठी साधकाला अतिशय आंतरिक युद्ध करावे लागते. तेव्हा कुठे तो मोहादी विभावांना जिंकून आत्मस्थितीमध्ये शुद्धोपयोगात स्थित होऊ शकतो. मोहराजपराजय व उपमितिभव प्रपंच कथासारखे अनेक ग्रंथ लिहून जैनाचार्यांनी आंतरिक संग्रामाचे वर्णन केले आहे. आगमामध्ये सुद्धा असे महत्त्वपूर्ण सूत्र प्राप्त होतात, ज्याचा पूर्वी उल्लेख केला गेला आहे. जो स्वतः आपल्याला जिंकतो तोच खरे सुख प्राप्त करू शकतो.
साधकाच्या भूमिकेनुसार साधनेचे उपक्रम गतिशील होतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर ते साधकाच्या योग्यतेवर आधारित असतात. म्हणून अनेकांत दृष्टिकोनातून व्रत, नियम, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान, आलोचना, प्रायश्चित इत्यादी आवश्यक आहे..
या क्रियामुळे शुभोपयोगाकडून शुद्धोपयोगाकडे गती करण्यात आधार मिळतो. कारण की, या क्रियेमुळे शुभयोगाची प्रवृत्ती होते. उदा. एखादी व्यक्ती श्रमण दीक्षा अंगीकार करू इच्छिते याचा जरा खोलवर विचार करा - श्रमण दीक्षेचे बाह्यरूप मुण्डन, केस लोचन, लिंग धारण वेष परिवर्तन इ. आहे. एक दीक्षार्थी ज्या भावनेने ते धारण करण्यास उद्युत होतो, ती भावना मुमुक्षूशी (मोक्षार्थीशी) जुडलेली आहे. आत्म्यात कर्मबंधापासून मुक्त होऊन आध्यात्मिक परमानंद प्राप्त करण्याची तीव्र भावना आहे. म्हणूनच तो दीक्षा घेण्यास तत्पर होतो. जरी बाह्यरूपाने श्रमण लिंगादी धारण करतो.