________________
RANA
SANSAR
SASE
FORNER
होतात की, त्याला मग दैहिक कष्ट दुःख किंवा पीडा ज्याला धर्मकीर्तीनी संताप म्हटले आहे. संताप होत नाही. तो त्यास कर्म निर्जराचे हेतू मानून आपल्या स्वतःत आध्यात्मिक आनंदात मग्न होऊन जातो. जर एखाद्या तपस्वीला तप केल्याने कष्टाची अनुभूती होत असेल, दुःखी, उद्विग्न होत असेल तर त्या तपाला तप म्हणता येणार नाही. ते फक्त कायाक्लेश मात्र आहे. कायाक्लेशचा तपात समावेश करता येणार नाही. खरा तपस्वी आत्म्याला क्लेश होतात असे मुळी मानतच नाही. कारण तो आत्मा आणि देह यात पूर्णपणे भेद मानतो. आत्मा म्हणजे शरीर नव्हे. व्रत, नियम, तप इत्यादीने शारीरिक पीडा झाली तरी तो त्यात प्रसन्नतेचा अनुभव करतो.
एक प्रश्न असाही आहे की व्रत नियम या सर्व गोष्टींना अनावश्यक मानले तर मग साधू-साध्वी, श्रावक, श्राविका हा चतुर्विध संघ याच्या अस्तित्वाचे काय ? कारण संघाचे चारही स्तंभ व्रत, आचार-संहिता व नियमोपनियम यावर आधारित आहेत.
व्रत, नियमोपनियम यांना शुभबंध रूपात मानतात. परंतु शुभ भाव असल्याशिवाय जीव शुद्ध दशेत पोहोचू शकत नाही. पुण्य एक अशी स्थिती आहे त्यामुळे मनुष्य पाप प्रवृत्तीकडे झुकतो. आणि धर्मप्रवृत्तीमध्ये सुद्धा जाऊ शकतो. पुण्य तत्त्वाला नीटपणे न समजल्यामुळे मनुष्याच्या मनात द्वंद्व निर्माण होतो. परंतु लौकिक दृष्टीने काही सीमेपर्यंत पुण्य उपादेय आहे.
पापामुळे जीव नरक व तिर्यंच गतीमध्ये जातो. पुण्यामुळे जीव देवगतीत जातो. पुण्य व पापाच्या समानतेमुळे मनुष्य जन्म मिळतो. जेव्हा पाप पुण्य दोहोंचा क्षय होऊन जातो तेव्हाच मोक्ष प्राप्त होतो.
'पुण्य' शब्दाची व्युत्पत्ती 'पुनातीति पुण्यम्' ज्यामुळे आत्म्यात उपशमभाव प्रकट होतो आणि जो आत्मशुद्धीत सहायक आहे त्यास पुण्य म्हणतात.
जे लोक पुण्याला विष्ठेसमान त्याज्य म्हणतात त्यांनी समजावे की पुण्य इतके तुच्छ नाही. जेव्हा लोक पुण्याची उपेक्षा करू लागतात तेव्हा शुद्धोपयोगात रहात नाहीत आणि शुभोपयोगाची वृत्तीसुद्धा रहात नाही. अशा स्थितीत केवळ वाणी आणि चर्चा करण्यातच शुद्धउपयोगाच्या गोष्टी करतात. परंतु व्यवहारात मात्र जास्तीत जास्त वेळ अशुभ कार्यात व्यतीत करतात. आजच्या आत्मवादी लोकांचे जीवन अशाच प्रकारचे आहे जे पुण्याला सर्वथा हेय व विष्ठासमान समजतात. परंतु पूर्वजन्माच्या पुण्योदयामुळे जे वैभव त्यांना प्राप्त होते, त्याचा अगदी पूर्ण उपभोग घेतात. याचा अर्थ असा झाला