________________
श्लोकातही आचार्य त्याच तत्त्वाचे आख्यान करतात. अव्रत, व्रत आणि ज्ञान-तीन मुद्दयांना घेतले आहे. मानसिक, वांचिक, व कायिक दृष्टीने सावध कर्मांचे अप्रत्याख्यान या अपरित्याग अव्रत आहे. अव्रतीचे जीवन धार्मिक कार्यापासून नेहमी दूर राहते. म्हणून नंतर धार्मिक उन्नतीच्या मार्गातील प्रथम चरण आहे. व्रताचा स्वीकार करणे जे अत्यंत आवश्यक आहे. याच गोष्टीबद्दल आचार्य पूज्यपाद व्रतांना ग्रहण करण्यासंबंधी या श्लोकात प्रथम चरणात विधान करतात. जेव्हा माणूस व्रतांचा स्वीकार करतो तेव्हापासून लगेच त्याच्या पापयुक्त प्रवृत्तींना आळा बसायला लागतो. तो मन, वचन, शरीराचे संवर साधू लागतो. शास्त्रीय भाषेत हेच व्रतीचे स्वरूप आहे. व्रत घेतल्यानंतर साधकाची आध्यात्मिक यात्रा सुव्यवस्थितपणे सुरू होते. मोक्ष प्राप्त करण्याचा अगदी योग्य मार्ग त्याच्यासाठी प्रशस्त होतो. आणि तो आत्मज्ञानाच्या दिशेने अधिकाधिक प्रगतीशील व प्रयत्नशील बनतो. बहिरात्म भावनेकडन अंतरात्म भावनेकडे आणि अंतरात्म भावनेकड़न परमात्म भावनेला संस्पर्श करतो. तो परमात्म ज्ञान संपन्न होतो. स्वतः परमात्मस्वरूप बनतो. आचार्य पूज्यपाद सुंदर वर्णन करतात. यात व्यावहारिक नैश्चयिक दोन्ही भूमिकांचे समाधान होते. व्यवहार नयानुसार व्रत, प्रतिज्ञा स्वीकार करण्याची, प्रतिलेखन प्रतिक्रमण प्रायश्चित, आलोचना, प्रत्यालोचना इ. क्रिया करण्याची सार्थकता सिद्ध होते. जेव्हा ज्ञानशुद्ध भूमिकेत प्रविष्ट होते तेव्हा अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्व क्रिया भावनेत बदलतात. जीवनाच्या सहजतेत समाविष्ट होतात.
व्यवहार आणि निश्चयाची कसोटी निश्चय आणि व्यवहाराच्या मर्माला समजणे सोपे नाही. या दोहोंच्या दार्शनिक गाभ्यापर्यंत पोहोचल्याशिवाय त्याचे रहस्य समजणार नाही. साधकाच्या जीवनाचे हे दोन पक्ष आहेत. या दोन्हींची आपली विशेषता आहे. उपादेयता आहे. परंतु जी व्यक्ती या गाभ्यापर्यंत जात नाहीत ती व्यवहार आणि निश्चयातील मर्म जाणू शकत नाही. ते सरळ शुद्धोपयोग अथवा शुद्धात्म भाव यांची चर्चा करू लागतात. चर्चाच फक्त करीत नाहीत तर ते जीवनातही तसेच आचरण करू लागतात. त्यांचे असे म्हणणे आहे की शुद्धात्म तत्त्वाच्या परिणमनातच धर्माची आराधना आहे. बाह्य सर्वक्रिया म्हणजे केवळ विधिविधान इ. व्यावहारिक आहे. या क्रिया व विधिक्रमानुकरणाने आत्म्याचे कल्याण होणार नाही. हे तर केवळ कर्मकांड आहेत. या कर्मकांडात तथाकथित धार्मिक लोक गुरफटले आहेत. आत्माच्या संबंधी अधिकांश ते विचारच करीत नाहीत. बाह्य क्रियात त्याग,