________________
(६९१)
आश्रवनिरोधः संवर८८ ही जी परिभाषा केली आहे ती याच भावनेची घोतक आहे. आश्रवाने येणारे कार्मिक प्रवाह थांबविणे म्हणजेच संवर आहे. सांगायला तर ही गोष्ट फार साधारण वाटते पण कर्मप्रवाहाला रोकण्यासाठी आत्म्याला आपला आंतरिक पराक्रम अत्यधिक सशक्त आणि सुदृढ रूपात उद्घाटित करावा लागतो. तेव्हा तशी स्थिती उत्पन्न होते की त्या प्रवाहाला थांबवले जाऊ शकते. आत्म्यामध्ये असे वळ उद्भवित करण्यासाठी भावनेचे फार मोठे कृतित्व सिद्ध होते. जलसिंचनाने लहानसा अंकुर उत्तरोत्तर वाढता वाढता एका विशाल वृक्षाचे रूप धारण करता त्याचप्रमाणे भावनेने अनुप्रणित पुरुषार्थ एक नवीन ऊर्जा आणि शक्ती प्राप्त करविते. जेव्हा जीवनात संवराची आराधना साध्य होते तेव्हा असे समजले पाहिजे की साधकाचे मोठे काम झाले आहे. पण साधनेचा मार्ग फार विकट आहे, इतकीच साधना साध्य प्राप्तीसाठी पुरे नव्हे साध्य प्राप्तीसाठी अजून साधना आवश्यक आहे.
जसे पूर्वी सूचित केले गेले आहे - आत्म्याबरोबर कर्माचे बंधन केव्हा झाले ? त्याचे उत्तर कुणी देऊ शकत नाही, कारण ज्याचा आदीच नाही, त्याच्यासाठी कालावधी निश्चित केला जाऊ शकत नाही. म्हणूनच संवराद्वारा अभिनव कर्म अवरुद्ध झाले तरी आत्म्यात संश्लिष्ट कर्माचा सर्वथा क्षय होत नाही. ते अवशिष्ट कर्म आपले काम करतच राहातात. आपल्या शुभाशुभ प्रकृतीच्या अनुरूप उदित होऊन आत्म्याला स्वभावाने पृथक करत राहातात. कधी दुःखात्मक स्थितीद्वारा आत्म्याला संक्लिष्ट अथवा व्यथित करत राहातात आणि कधी भौतिक विषय वासनात्मक स्वर्गादिक सुखात विमोहित करतात. अंतरात्मभाव मूलक चिंतनात जेव्हा जीव संलग्न राहातो तेव्हा त्याच्या अंतःकरणात एक नवीन परिणाम उद्भवित होतो. तो विचार करती की "मी माझ्या संचित कर्माता निर्जीर्ण करतो, म्हणजे माझ्या विशुद्ध, मळ रहित, उज्ज्यत चिन्मय भावाला अभिव्यक्ती मिळेल." निर्जरा भावनेत तेच तत्त्व आहे ज्याला ज्ञानी महापुरुषांनी ग्रंथकारांनी आपल्या आपल्या शब्दात विविध प्रकारे प्रकट केले आहे. कारण सत्यचे पुन्हा पुन्हा वर्णन व्हायला पाहिजे त्याची पुनरावृत्ती दोष नाही, गुण आहे. एक असत्य गोष्ट शंभर लोकांना सांगितली तर त्यातल्या अनेक लोकांना ती सत्य बाटू लागते तर मग सत्य आणि तथ्य ज्याच्यात आहे त्याचे तर सांगायचेच काय ? जर त्याचे पुन्हा पुन्हा आवर्तन केले गेले तर निश्चित त्याचा प्रभाव पडतो.
तपश्चरणाचा मुख्य हेतू निर्जरा आहे. "तपस्य निर्जराच" ८९व्या तत्त्वार्थसूत्रात