________________
(६९०)
जाते. तरुणावस्थेतील सुंदर शरीर वृद्धावस्थेकडे झुकू लागले. विलास आणि उल्हास विषादात बदलते. म्हणूनच संसारभावनेत उपाध्याय विनयविजयजी अतिशय हृदयस्पर्शी शब्दात लिहितात. "कलय संसार मतिदारुणं' हा संसार अत्यंत दारुण, भयंकर दुःखाने व्याप्त आहे. स्पष्टपणे जे दिसते शारीरिक, मानसिक, आर्थिक, पारिवारिक, सामाजिक इ. स्थितीतील दुःखतर आहेतच. परंतु मानव ज्यांना सुख समजतो वास्तविक ते सुख नाही. त्याचा परिणाम दुःख रूपातच प्रस्फुटित होते. म्हणून संसारातील भौतिक दुःखमय अवस्था आणि सुखमय अवस्था दोन्हीही कल्याणकारक नाही. अशुभ लोखंडाची बेडी आहे तर शुभ सोन्याची बेडी आहे. दोन्ही ही शेवटी आहेत तर बेड्याच. म्हणजे बंधनच बंध, कधीच सुख किंवा शांती मिळू शकत नाही.
का आहेत ही बंधने ? भावना मूळ उद्देश्याकडे वळवते.
संसारअवस्था भव-भ्रमण, जन्ममरण किंवा आवागमनचे कारण कर्म आहे. सांसारिक आत्मा अनादीकाळापासून कर्मबद्ध आहेत. हे बंधन आत्मा स्वतःच तोडण्यास समर्थ आहे. अन्य कोणतीही शक्ती कर्म तोडण्यास समर्थ नाही. आत्मा स्वत:च हे कार्य करू शकतो. कोणतेही कार्य नष्ट करण्यासाठी अगोदर त्याचे कारण शोधावे लागते. तेव्हाच ते नष्ट करू शकतो. कारण नष्ट झाले तर कार्य आपोआप नष्ट होते. जेव्हा आत्मा याकडे वळतो तेव्हा त्यास अनुभव होतो की कर्माचा हेतू आश्रव आहे. "आसमंतात श्रवति इति आश्रवः' जो सतत प्रवाहित राहतो त्यास आश्रव म्हणतात. पाण्याचा प्रवाह ज्याप्रमाणे सतत वाहत असतो आणि सरोवरात. सागरात जाऊन मिळतो. त्याचप्रमाणे आश्रवद्वारा आत्म्यामध्ये कर्म येतच असतात. आत्मप्रदेशांशी एकरूप होऊन जातात. आत्म्याचे चिन्मय, आनंदमय तथा शक्तिमय स्वरूप आहे त्यास आवृत्त करतात. असे मनात चिंतन चालते. भावानुप्रणित होते. असा अनुभव करतो की शुभाशुभ योगाश्रव इ. द्वारा पुण्यपापात्मक जे कर्म परमाणुबद्ध होतात ते आत्मासाठी हितकारी नाहीत. ते आत्म्याचे हनन करणारे आहेत. शुभ किंवा पुण्यात्मक बंध, बाह्य सुविधा-अनुकूलता देतात. धन, वैभव आणि स्वर्गाचे सुखही देतात. परंतु शेवटी ते सर्व बाह्यरूपाने आकर्षक वाटणारे सुख दुःखकारकच आहेत. असे चिंतन वारंवार केल्याने ते प्रबल प्रबलतर होत जाते.
खऱ्या अर्थाने हे उदात्त भाव मनात येतात. मग पापमय प्रवाहाला असे थांबवावे, अशी साहजिकच मनाची उत्सुकता जागृत होते. ज्याचे समाधान संवर-सम् वृनोति इति संवर' जो संवर अवरोध किंवा निरोध करतो त्यास संवर म्हणतात. आचार्य उमास्वातीने