________________
(६८९)
होणार नाही. कर्मश्रृंखला दोन प्रकारच्या आहेत. एक अशुभ अध्यवसाय व दुसरी शुभ अध्यवसाय. अशुभ अध्यवसायाने पापाचे बंध होतात आणि शुभ अध्यवसायाने पुण्य बंध होतात. पापाच्या परिणामस्वरूप जीव अनेक प्रकारच्या दःखात पडतो. सहन करतो.
नरक पापाचे फळ आहे. विभिन्न पशुपक्ष्यांचे दुःखमय जीवन त्यांच्या पूर्वजन्माच्या अशुभ कर्माचा परिणाम आहे. मानव जीवनात दरिद्रता, दुःख, रोग तथा अनेक प्रकारच्या विपत्ती सुद्धा आपआपल्या आचरित कर्मामुळे निष्पन्न आहेत. हे सर्व अशुभोपयोगचे परिणाम आहेत. असंख्य, अनेक प्रकाराच्या क्लेशाच्यारूपात त्याची परिणती होते. अशुभोपयोग सर्वथा त्याज्य आहे. त्यात ग्रस्त होण्याचे मुख्य कारण अज्ञान आहे. जीव आत्मा आणि जड निर्जीव) यांचा यथार्थ भेद समजत नाही. शरीराच्या भोगांना व सांसारिक संपत्तीला तो सर्वोपरी मानतो. ही विभ्रांती आहे. अनित्य भावना या विभ्रांतीला दूर करण्याचा अनन्य उपाय आहे.
अनित्य भावनेला अधिक श्रेष्ठ करण्याचा भाव अशुची भावनामध्ये सन्निहित आहे. वरून सुंदर, सुमधुर, सुरभित, प्रिय आणि आकर्षक करणारा दैहिक कलेवराचे वास्तविक स्वरूप उपस्थित होते. जे शरीर इतके घृणास्पद आहे की क्षणभर सुद्धा आपण वाहू शकणार नाही. देह तथा भौतिक पदार्थांची नश्वरता याचे भान होताच मनात स्व आणि पर यातील भेदाची जाणीव होते.
आत्मा अजीवापासून सर्वथा भिन्न आहे. जड शरीर इत्यादी बरोबर जे साहचर्य आहे ते कर्मसंयोगामुळे आहे. हे साहचर्य तोपर्यंत असेल जोपर्यंत कर्म बंधन संपुष्टात येत नाही. कर्म तोडण्यासाठी प्रथम दृष्टी अशुभावर जाते. व्यक्ती पाप सोडते. कारण सर्वांची हीच इच्छा असते की, त्यांना व्याधी, धनाभाव, पारिवारिक दुःख नसावे. म्हणून पापकर्माबद्दल अरुची उत्पन्न होते. परिणामस्वरूप सुखमय मार्गाकडे तो अग्रसर होतो. तशी त्याला प्रेरणा मिळते. संसाराचा एक पक्ष घोर दःखमय आहे. आणि एक पक्ष भौतिक दृष्टीने विपुल सुखमय सुद्धा आहे.
देवगतीमध्ये तर अपरिमित सुखच सुख आहे. या संसारात सुद्धा संपन्न, धनवान, सत्ताधीश, उच्चअधिकारी युक्त व्यक्ती अत्यंत सुविधापूर्ण जीवन व्यतीत करतात. खाणेपिणे, रहन-सहन, सत्ता, प्रतिष्ठा इ. सर्व त्यांना मिळते. हे सर्व शुभ कर्माच्या परिणामाचे फळ आहे. पण याबरोबर एक विडम्बना आहे. एकेकाळी सुखी असणारी व्यक्ती अचानक दुःखाच्या खाईत सुद्धा पडते. स्वस्थ असणारे शरीर अचानक व्याधिग्रस्त होऊन