________________
(६८७)
SummissiratSISTRoymsenelevelAJLAR
योगेन्दु देव यांनी एक छोटे रूपक देऊन आत्म्याच्या शुद्धोपयोगाचे मोठ्या सरस शब्दात वर्णन केले आहे.
एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला म्हणते, अग, मी त्या आरशाचं काय करू ? ज्यात माझे प्रतिबिंब दिसत नाही. हा संसार म्हणजे गोरख धंद्यासारखा आहे असे वाटते. घरात राहूनही मला घरमालकाचे दर्शन होत नाही.८१
या मायामय रागादीने रंजित जगात विभ्रांत मानवाला शुद्धात्म भावाची प्रेरणा देताना म्हणतात की, ज्याप्रमाणे त्या आरशाचा काही उपयोग नाही. त्यात आपले प्रतिबिंब दिसत नाही. त्याचप्रमाणे या जीवनाचे काय महत्त्व आहे ? हा तर अती विचित्र आणि गोरखधंद्यासारखा आहे. जिथे आत्म्याच्या शुद्ध भावाची प्रतिती होत नाही, आणि खरं तर तो आपल्यामध्येच विराजमान आहे.
___माणसाच्या हृदयात आरसा आहे. पण त्याला आपला चेहरा त्यात दिसत नाही. चेहरा तर तेव्हाच दिसेल जेव्हा मनाची दुविधा नष्ट होईल. अर्थात अंतःकरणाच्या आत जर राग, द्वेष, काम, क्रोध इ.ची दविधा नसेल तर शुद्ध परमात्म भावाची अनुभूती होऊ शकते. परंतु असे होत नाही याचे कारण तो आरसा (हृदय) दुविधांनी सांसारिक मोह मायात्मक काळीमामुळे घूमिल झाला आहे.८२
कबीराने शुद्ध भावानुभूतीचा मार्ग दाखवताना म्हटले आहे- जर तुम्ही शुद्ध आत्मभावाचे दर्शन करू इच्छिता तर हृदयरूपी आरसा स्वच्छ करा. जोपर्यंत आरसा धुळीने माखलेला असेल तोपर्यंत आत्मभावाचा साक्षात्कार होणार नाही.८३
__परमतत्वोपलब्धी तेव्हाच साध्य होऊ शकते, जेव्हा त्यासाठी साधनाच्या रूपात बलिदान केले जाईल. हीच गोष्ट कबीर आपल्या सधुक्कडी भाषेत सांगतात- जो आपल्या मस्तकाची रक्षा करतो, सांसारिक राग आणि ममत्वामध्ये लिप्त राहतो. त्याचे मस्तक जाते अर्थात् त्याला त्याचे वास्तविक लक्ष (ध्येय) त्याला मिळत नाही. जो सांसारिक ममत्वापासून दूर राहतो, तो वास्तवात शुद्धात्म भावानुरूप मस्तकाला प्राप्त करू शकतो. दिव्यातील ज्योत पुढे-पुढे जळत जाते आणि प्रकाश देत जाते.८४ प्रकाश पसरविण्यासाठी त्याला जळणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आध्यात्मिक उपलब्धिहेतू भौतिक उपलब्धी बलिदान करावी लागेल.
___ चैतन्य स्वरूपाचा स्वभाव शांत आणि वीतराग भाव आहे. अशा स्वरूपाचे ध्यान केल्याने आत्मशुद्धी आणि आत्मसिद्धी प्राप्त होते. सर्व ज्ञानीजनांनी हाच मार्ग स्वीकारला होता.