________________
(६८८)
एका काडीचे दोन तुकडे करण्याची शक्ती ज्यांच्यात नाही, अशा शुद्ध चैतन्य स्वरूप आत्मा अनंत शक्तीचा मालक आहे. एकदा का तो जागृत झाला, आपल्या स्वरूपात तन्मय झाला तर दोन घडीत (४८ मिनिटात) मोक्ष प्राप्त करतो.८५
अशा आत्मतत्याला प्राप्त करण्यासाठी मुमुक्षू विचार करतो की, या संसाररूपी चक्रात पडून अगोदर सम्यग्दर्शन इ. भावनांचे चिंतन केले नाही. आता त्याचे चिंतन करतो. आणि मिथ्यादर्शन इ. भावनांचा तर पुन्हा पुन्हा चिंतन केले त्याचे आता चिंतन करीत नाही. अशा प्रकारे मी आता पूर्वभावित भावनांचा त्याग करून त्या अपूर्व भावना करतो आहे. कारण की अशी भावना भवभ्रमणाच्या विनाशाचे कारण आहे.८६
अतःकरण शुद्धता आणि भावांची पवित्रतासाठी वाणीत, ध्वनित, शब्दात, विचार विमर्शात सदा सत्य असले पाहिजे.
आत्मभावमूलक वरील विवेचनावरून असे प्रतीत होते की, त्रिकालाबाधित सत्य हे सर्व ठिकाणी सत्यच असते. केवळ त्याच्या मूळापर्यंत जायला पाहिजे. जैनदर्शनाचा दृष्टिकोन खूप उदार राहिला आहे. जैनधर्मात बहुश्रूत तो असतो जो आपल्या सिद्धांताच्या गाढा अभ्यासक असतो व दुसऱ्यांच्या सिद्धांताचासुद्धा बारकाईने अभ्यासू असतो. मग धर्माधर्मातील संकीर्णता आपोआप दूर होते.
आत्मभावनेचे अध्ययन केल्याने सत्यताचे क्षेत्र व्यापक होते. सत्य तर विराट आहे. सत्याच्या अनेक मार्गांचा व्यापक बोध हा सत्याची खरी ओळख होण्याचा प्रशस्त मार्ग आहे.
ज्याची जशी भावना असते त्याला तशी फळ मिळतात. आत्म्याच्या शुद्धोपयोगाने प्राप्त होणारे फळ मुक्ती आहे. आत्मभावनेने भावित भव्य जीवांना मोक्ष प्राप्त होतो. आत्मभावनेच्या बळानेच भरत चक्रवर्ती इत्यादींना मोक्ष प्राप्त झाले. शुभभावनेने शुद्धभावना उत्पन्न होते.
महान अध्यात्मयोगी आचार्य कुन्दकुन्द, पूज्यपाद हरिभद्रसूरी इत्यादी आचार्यांनी साधकाला मोक्षानुगामी मार्गावर आरूढ होण्याची प्रेरणा देण्याच्या हेतूने शुद्धोपयोग किंवा शुद्ध भावनाचा आपआपल्या ग्रंथात मार्मिक विश्लेषण केले आहे. जर सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर अनित्य इ. बारा भावना आणि मैत्री इ. चार भावनांचा अंतिम निष्कर्ष आत्म्याच्या शुद्ध स्वरूपाला स्वायत्त करणे हाच आहे. ही ती स्थिती आहे जिथे कर्मबद्धता होत नाही. जोपर्यंत आत्मा कर्माने बद्ध राहिला तोपर्यंत त्याला आपल्या सत्य स्वरूपाचा साक्षात्कार