________________
(६८५)
जीवनात ही जितकी शांती, जितका आनंद आणि जितके चैतन्य स्फुरित होतो ती सर्व अवस्था मोक्षाची आहे.
तत्त्वज्ञानरहित प्राण्यांना आत्माचे ज्ञान आणि श्रद्धा नसते. तो ज्या शरीरात आहे त्या स्वरूपात त्याला आपले मानतो. आपल्या आत्मस्वरूपाकडे त्याचे लक्षच जात नाही. म्हणून तर राग, द्वेष, मोहात पडून तीव्र पापकर्म बांधतो. परंतु ज्याने सम्यक्त्व प्राप्त त्याने संसारवृक्षाच्या मूळातच घाव घातला. त्याला मग कर्मबंध झाले तरी शीघ्र दूर ही होतात. त्याचे कारण असे की, त्याची बुद्धी संसारात लिप्त होत नाही. कारण त्याच्या अंतरंगात भेदविज्ञान जागृत झालेला आहे की, माझ्या आत्म्याचा स्वभाव ज्ञानमय, दर्शनमय, सुख, वीर्यमय, अमूर्तिक, अविनाशी आहे. या जगात परमाणुमात्र सुद्धा माझा नाही. या भेदज्ञानामुळे तो साधक आत्मसुखाच्या स्वाद घेण्यास उत्सुक राहतो. न आपल्या आत्म्याचे ध्यान करीत राहतो. शरीर आणि आत्मा हे वेगळे आहेत. आत्मा स्वतंत्र आहे. शरीर स्वतंत्र आहे. आत्मा म्हणजे शरीर नव्हे शरीर म्हणजे आत्मा नव्हे. हे आहे ते भेदज्ञान, तो आत्मसुखाच्या स्वोदसाठी उत्सुक राहून आपल्या आत्म्याचा ध्यान करतो. भेद ज्ञानावर एकदा पूर्ण श्रद्धा बसली की मग स्वात्मानुभव निश्चितपणे होतो. जो धीराचित्तएकाग्र करून शुद्ध भावनेचा अभ्यास करतो तो शुद्ध क्षमा भावनेने क्रोध रूपी जल प्रवाहाला थांबवतो. शुद्ध मार्दव भावनेने मानरूपी स्तंभ निश्चितपणे दूर कराते आर्जवतेने वञ्चकता धूर्तता इत्यादी विषाचे हनन करतो. जो ह्या सुंदर शरीरात आसक्त नाही तो निश्चितपणे लोभरूपी सिंहाला पण जिंकून टाकतो, जो शुद्ध मनाने धर्माचे आचरण करतो ते मनरूपी मर्कटाला वश करतो, जो शुद्धभावनेने वीतरागीची भक्ती करतो, तो मोह रूपी दुष्टराग तत्क्षण नष्ट करतो. जो सर्व प्रकारे धर्माचरण करतो भावनेत शुद्धी ठेवतो आणि ध्यानयोग करतो ता केवलज्ञान पण प्राप्त करू शकतो. ७६
ज्यांची प्राण, इंद्रिये मन आणि बुद्धी विषयक सर्वप्रवृत्ती संकल्परहित असते ते पुरुष शरीरात विद्यमान असून पण त्याच्या गुणाने विमुक्त राहातात.
"देह छता जेणी दशा बरते देहातीत ।
ते ज्ञानी ना चरणमा वंदन हो अगणिता ||
असेच ज्ञानी पुरुष जगात वंदनीय ठरतात जे देह असताना पण देहातीत दशेत
राहातात.
आत्मज्ञानी पुरुषांच्या शरीरावर हिंसक प्राण्याने घात केला तरी त्यांच्या आत्म्यात