________________
(६८३)
शुद्ध भाव अथवा शुद्धोपयोगाच्या दृष्टीने प्रयत्नशील होण्यासाठी साधकाला फार सुंदर काव्यात्मक शैलीत उद्बोधन दिले आहे. आध्यात्मिक सुख याची तुलना कोणत्याही सांपत्तिक सुखाशी होणार नाही. तरी ही साधक त्याला गौण मानून संसाराच्या मोहात गूढ होते आहे. ही त्याची किती मोठी चूक आहे. हे सांसारिक सुखोपभोग मोक्षरूपी महानलक्ष्य प्राप्तीत बाधक आहे. हे त्याने समजायला हवे. शुद्धात्मभाव किंवा शुद्धोपयोगाचा आश्रय घेतल्यानेच परम लक्ष्य सिद्ध होऊ शकतो. आचार्य अमितगती यावरच विशेष महत्त्व देऊ इच्छितात.
जो धन-भृत्य-सेवक, लक्ष्मी-संपत्ती सुरक्षित ठेवून दृढतेने ग्रहण करून त्यात अत्यंत आसक्ती ठेवून, पवित्र, निर्मल, स्थावर-अविनश्वर आत्मसुख प्राप्त करण्याची इच्छा ठेवतो तो अज्ञानी होय. मी असे मानतो की, असा मूर्ख प्रलथ काळात उठणाऱ्या लाटांना पकडून अपार समुद्राला पार करू इच्छितो. अर्थात सांसारिक धन, संपत्ती, वैभव इत्यादीमुळे आध्यात्मिक सुख प्राप्त होणे केवळ दुर्लभ आहे. या नश्वर वस्तूमध्ये शाश्वत सुखाची इच्छा करणे हे अज्ञानाचे लक्षण आहे.६९
जो प्राणी स्वच्छ, निर्मल मनात भाव परिणाम ठेवतो तो स्वर्ग व मोक्ष रूपी लक्ष्मीला अवश्य प्राप्त करतो. आणि जो म्लान, दोष युक्त भाव परिणाम ठेवतो तो घोर दुःख उत्पन्न करणाऱ्या नरकादी गतीमध्ये जातो. म्हणून सत्पुरुष प्रथम स्वच्छ परिणाम ग्रहण करतो आणि अशुभ परिणामांचा विवेकबुद्धीने त्याग करतो.७०
ग्रंथकाराच्या कथनाचा उद्देश्य असा आहे की, शुद्धभाव किंवा परिणामाने स्वर्ग व अपवर्ग प्राप्त होतात. परंतु दुष्परिणामाने, अशुभ परिणामाने नरक वगैरेचे धोर दुःख प्राप्त होते.
अशुद्ध परिणामामुळे जीव नरकगती, शुभपरिणामुळे स्वर्ग तथा चेतन-आत्म्यात दृढ श्रद्धा ठेवणारे जीव कर्मरहित होऊन अनवद्य-निर्दोष शिवपद-मोक्षपद-प्राप्त करतो. असे जे मोक्षपद प्राप्त करण्याची इच्छा ठेवतात, त्यांनी तर मन सतत शुद्ध परिणामातच ठेवायला हवे. सतत शुद्धभावनेचेच चिंतन करायला हवे. शुद्ध परिणाम सतत वृद्धिंगत ठेवायला पाहिजे.
___ नरकात नारकीय जीव सतत एकमेकांना असह्य वेदना देतात. ज्याचे वर्णन आपण वाणीद्वारा करणे सुद्धा अशक्य आहे. तिथे अनंत, घोर दुःखच, दुःख आहे. तिर्यंच योनीत ज पशु-पक्षी-प्राणी आहेत त्यांना पर छेदन-भेदन, भूक-तहान ताप, परिताप यामुळे