________________
SSSSSSSS
वसन
PRESIDE
SENSE
(६८४)
होणाऱ्या वेदना सहन कराव्या लागतात. मनुष्यालासुद्धा व्याधी, वियोग, जन्म-मृत्यू इ. दुःख भोगावे लागतात. देवगतीमध्ये सुद्धा मानसिक पीडा तर आहेच. अशाप्रकारे या विश्वात अनंत दुःखच भरलेले आहे. जगातील शोक, पीडा, वेदना दुःख पाहून तरी माणसाने यातून मुक्त होण्याचा जो मार्ग आहे त्याचे अवलंबन करून आपली बुद्धी मोक्ष-मुक्ती मिळवण्याकडे लावली पाहिजे. संसारात राहून पण त्यात लिप्त न होता. संसारात न गुरफटता मोक्ष प्राप्तीचा ध्यास घ्यायला पाहिजे त्यालाच ज्ञानी म्हणता येईल. शाश्वत सुख मोक्षानच आहे.७१
ज्याप्रमाणे पाण्यात मातीचा गोळा विरघळून जातो. त्याचप्रमाणे दुष्कर कठिण श्रम, प्रयत्नपूर्वक केलेले संसारी कार्य क्षणभरात नष्ट होऊन जातात. वस्तुस्थिती अशी आहे तरीही हे अज्ञानी जीव सांसारिक कार्यात प्रवृत्त राहतात याचा खेद वाटतो. बुद्धिमान व्यक्ती फक्त श्रमजनक, परिश्रांत करणारे निरर्थक कार्यात कधीच सलग्न रहात नाहीत.७२
नानाप्रकारचे उपद्रव-आपत्तींनी युक्त अत्यंत मलीन अस्वस्थ आत्मशांती रहित अशा या संसाराला तथा आपत्ती विरहित, नित्य निरंतर उच्च सुखमय मुक्तीला, कषायाने मोहित बुद्धियुक्त प्राणी तत्त्वतः समजत नाही अर्थात् त्याचे यथार्थतः भेदज्ञान करू शकत नाही. त्याला हे भेदज्ञान समजले पाहिजे की अत्युत्तम सर्वोत्कृष्ट युक्तीला सोडून अशा संसारात का अनुरक्त होत आहे.७३
अती खेदाची गोष्ट आहे की, सांसारिक प्राणी विषयभोगांची आकांक्षाच्या वशीभत होऊन भिन्न-भिन्न प्रकारची हिंसा वाढवणारी असि-तलवार, मसि-लेखनी, कृषीशेती, वाणिज्य व्यापार, शिल्प-कारागरी, विद्या-कळा या सहा प्रकारच्या आजिविकांच्या साधना विषयक क्रिया करतो आणि द:खाची उत्पत्ती होते मग भारी कर्म बंधनात जातो. निरोगत्व, स्वस्थता प्राप्त करण्याची इच्छा ठेवून हे प्राणी अपयश, स्वाध्याच्या दृष्टीने हानीकारक, विकारोत्पदक भोज्य पदार्थाचे सेवक करतो. मग समस्त अंगोपांगात व्यथा उत्पन्न करणारे रोग त्याने पीडित होतो तसे कष्ट त्यांना प्राप्त होते.७४
आचार्य उमास्वाती लिहितात 'ज्याने अहंकार आणि वासनावर विजय मिळवला, मन, वाणी आणि शरीराच्या विकाराला धुवून टाकले ज्यांच्या आशा निवृत्त झाली त्या सुविहित आत्मासाठी मोक्ष आहे.७५
आत्म्याच्या सिद्धांत निश्चित झाला मग त्याच्या विकासाची दृष्टीपण प्राप्त झाली. विकासाच्या साधनांचे अन्वेषण केले गेले. मोक्षमार्ग काही पारलौकिक नाही व वर्तमान