________________
(६८२)
ज्याप्रमाणे शरीर आणि वस्त्र भिन्न आहेत शरीर वख नाही, त्याचप्रमाणे आत्मा शरीर स्वरूप नाही.
आत्मा हा नित्य ज्ञानस्वरूप, निर्मल सर्व दुःख विनिभृक्त आहे असे जाणत असूनही मनुष्य किती मिथ्या कल्पना करतो की मी गोरा, सुंदर, सुदृढ, परिपुष्ट, स्थूल, कृश, कर्कश, देव, मनुष्य, पशू, नारक, नपुंसक, पुरुष, स्त्री आहे.६६
हे तर सर्व कर्मोदयामुळे प्राप्त दैहिक पर्याय आहेत. जो सर्व आरंभ, कषाय व संग रहित आहे, जो शुद्ध ज्ञानदर्शनमय उपयोगाने पूर्ण आहे, जो सर्व कर्ममलाने रहित आहे. ज्याला कोणत्याही बाह्य पदार्थाची अपेक्षा नाही. हाच तो आत्म्याचा उत्कृष्ट स्वभाव आहे. मोक्ष प्राप्तीसाठी सतत मनात निर्पेक्ष भावाचे ध्यान करतो. स्वात्मानुभवच आत्म्याला परमात्मा पदापर्यंत घेऊन जाणारा आहे. बुद्धिमान जो भेदविज्ञानी पुरुष रागवर्धक चिंतनाचा त्याग करून आत्मचिंतन करतो, पर चिंतनाने बंधन वाढतात. आत्म्याच्या मुक्तीमार्गात तो अडथळा आहे. विघ्नकारक आहे. व्यवहारात सुद्धा पहा- समयानुकूल कार्य केले तर ते शोभते. त्याचप्रमाणे आत्मभावनेच्या विरुद्ध भावनेपासून आपला बचाव करायला पाहिजे. जो मनुष्य आपल्या शरीराविषयक कार्यात जागृत आहे, ते हेय अर्थात त्याज्य आहे. आदेय म्हणजे ग्रहण करण्यायोग्य नाही. आत्म्याच्या उन्नतीसाठी शरीरधर्म हा अडथळा आहे. अशी व्यक्ती खरी साधना करण्यास अयोग्य आहे. ज्याचे शरीराकडेच लक्ष केंद्रित आहे. शरीराचीच सेवा करण्यात वेळ घालवतो तो आत्मसाधक असूच शकत नाही. ज्याला आत्मकल्याण साधायचे आहे त्याने शरीराचा मोह सोडलाच पाहिजे. ज्याला खरोखर आत्मसिद्धी प्राप्त करायची तळमळ आहे तो आत्मसंपन्नता वाढविणारी कृती करेल. त्याच्या विरुद्ध कृती त्याच्याकडून होणारच नाही.६७
स्वस्थ आपल्या आत्म्यात विद्यमान कर्मोदयाने अप्राप्त शाश्वत-अविनाशी मनरहित, निर्मल, विद्वत् जन प्रार्थीत्-ज्ञानीजनांद्वारे अभिप्सित स्थिर बुद्धिपूर्वक आत्माद्वारे सहज प्राप्त होण्यास योग्य सुख आपल्याजवळ असताना तू बाह्य इंद्रियजनित सुख प्राप्त करण्यासाठी कष्ट का करतोस की ज्याचा परिणाम दुःखद आहे तथा जे नश्वर आहे. अरे, मूर्ख ! शिवमंदिर मुक्तीरूपी मंदिरात आध्यात्मिक संपत्तीचे निधान आहे, तू भिक्षेसाठी का भटकतो आहेस.
आचार्य अमितगतिंनी इथे सत्तत्त्व अर्थात् शुद्ध आत्मत्त्वांचा, स्वभावाचा विभावात्मक जगातिक पदार्थानी भोग-सुख आणि साधना यापासून सर्वथा भेद दाखवताना