________________
(६८०)
या श्लोकात आचार्य कुन्दकुन्दांनी प्रतिपादन केलेल्या पंचपरमेष्ठी आणि सम्यग्दर्शन आदी आराधना इतरत्र कुठेही नाही. परंतु आत्म्यातच स्थित आहे. अर्थात् ह्या सर्व आत्म्याच्या अवस्था आहेत असा उल्लेख केला आहे.
यांच्या आराधना साधना द्वारा समाधीमरण आणि सर्वोत्तम सुख शांतीचे परमधाम मोक्ष प्राप्त होऊ शकतो. म्हणन मुमुक्षूंनी निरंतर आत्मभावनेत रत राहिले पाहिजे.
आत्मभावनेचे विवेचन करताना श्री अमितगति आचार्य लिहितात- जो आत्मार्थी साधक चिंतन करतो की मी कोणाचाही नाही, कोणताही पर भाव, अन्यभाव माझा नाही, आत्मतत्ववेत्ता साधक ज्ञान व दर्शनाने अलंकृत आत्मा, परम ज्ञान दर्शन युक्त द्रव्य कर्म आणि भाव कर्माने रहित आत्म्याला सोडून मी कोणाचाच नाही. कोणताही परकीय भाव माझा नाही. आत्मतत्त्ववेत्ता साधकाच्या चित्ताची अशी अवस्था होते तेव्हा त्या महापुरुषाला कोणताही बंध (कर्म) होत नाही. ज्याच्यामुळे तीनही लोक जकडलेले आहेत. ५८
ज्या शरीराचे अनेक प्रकाराने स्वस्थ, सुंदर, सुदृढ करण्यासाठी पालन-पोषण केले जाते, ते शरीर आपले नाही. ज्याप्रमाणे ज्याच्याशी कर्म बांधले आहेत त्या कर्माच्या वशीभूत पुत्र, स्त्री, मित्र, पुत्री, जावई, आई, वडील इ. लौकिक संबंध बांधले ते आत्म्यापासून सर्वथा भिन्न आहेत. आत्म्याला कोणतेही नातंगोतं नाही. आत्म्याला बंध नाहीत ( निश्चयदृष्टीने) म्हणून ज्ञानीपुरुषाने आपली बुद्धी आपल्या आत्म्यातच स्थिर करावी ५९
आत्माज्ञानी आहे. जर त्याची सेवा केली तर तो परमनिर्मल ज्ञान देतो. अर्थात आत्मस्वरूपानुभूतीने परम निर्मल ज्ञान प्राप्त होते. शरीर अज्ञानी आहे. ते तर घोर अज्ञानच देते. संसारात सर्वत्र हे प्रसिद्ध आहे की ज्याच्याजवळ जे असते तेच तो दुसऱ्यांना देतो. कोणी मोठा दानवीर असला तरी कुणाला आकाशकुसुमदान नाही करू शकत. कारण आकाशात पुष्प असणे असंभवच आहे. ६०
प्रस्तुत श्लोकात आत्मा आणि देह यांच्या भिन्नतेवर प्रकाश टाकला आहे व दोघांचे स्वरूपाचे चिंतन केले आहे. आत्मा चिन्मय, ज्ञानस्वरूप आहे तथा शरीर ज्ञान रहित जड (अजीव) आहे. आत्मकल्याण करण्याचे साधन तर एकमात्र ज्ञानच आहे जे आत्माच देऊ शकते. शरीर ज्ञान देण्यास सर्वथा असमर्थ आहे. परंतु हे ज्ञान कसे प्राप्त होईल तर जेव्हा शरीर आणि आत्मा भिन्न आहेत हे भेदज्ञान प्रतीत होईल. आत्मभावनाचे