________________
(६७८)
जीव अत्यंत शुद्ध भावपूर्वक जीवस्वभाव किंवा आत्मस्वभावाची भावना करतो, असा मुनी वृद्धावस्था आणि मृत्यूचा नाश करतो. म्हणजे जन्ममरणाच्या चक्रव्यूहातून मुक्त होतो. आणि लवकरच निर्वाण प्राप्त करतो. जिनेश्वर प्रभुंनी जीवात्म्याला ज्ञानस्वभाव आणि चैतन्य स्वरूप प्रतिपादित केले आहे. माझा हा आत्मा तसाच आहे. आत्माच सर्व कर्मांचा क्षय करून मोक्ष प्राप्त करण्यास समर्थ आहे, असे समजावे.४९
जो जीव आत्म्याच्या आस्तित्वाला मानतो त्या आत्म्याचा सर्वथा अभाव आहे असे कधीच मानत नाही. तो वचनातीत आहे. त्याचे शब्दात वर्णन करणे अत्यंत कठीण आहे. असा देहाहून भिन्न परमात्मा बनून जातो. असे अतिन्द्रिय, आत्मदशा आत्मानुभव प्राप्त करून परमात्मदशा हस्तगत करतात. हे जीवा, तू सुद्धा आत्म्याच्या ह्या स्वभावाला समजून घे, अर्थात देहाहून वेगळा शुद्ध स्वभावी आत्म्याला ओळख आत्मा पाच प्रकारच्या रसाने रहित आहे. शब्द, रूप, गंध, स्पर्शरहित आहे, चेतना गुणसंपन्न आहे. त्याचे स्वरूप इंद्रिय-ग्राह्य नाही. म्हणून तो अलिंग अर्थात स्त्री, पुरुष, नपुंसक तिन्ही लिंगाने रहित आहे. आत्म्याचा कोणताही आकार (संस्थान) नाही. तो शुद्ध चैतन्य गुणमय आहे.
हे आत्मन् ! अज्ञानाचा नाश करणारे मती, श्रुत, अवघी, मनपर्याय आणि केवल या पाच प्रकारच्या ज्ञानांची भावना मनात वाढवून अनुभावित बना. ज्यांचे भाव या ज्ञानात्मक भावनेने भावित आहेत ते देवलोक, विषयसुख आणि मोक्ष सुखाचा अधिकारी
बनतो.५०
शुभभाव म्हणजे मंद कषायरूप विशुद्धभावद्वारा जीव चक्रवर्ती इ. चे विपुल राज्यवैभव प्राप्त करतो. विशुद्ध भावद्वारे तो विद्याधर, देव आणि मनुष्य इ. द्वारा वंदनीय होतो. अर्थात हे सर्व त्याची पजा करतात. नंतर त्यास बोधी-रत्नत्रयात्मक मोक्ष मार्ग प्राप्त होतो.
जिनेश्वर देवाने अशुभ-शुभ आणि शुद्ध तीन प्रकारचे भाव सांगितले आहेत. अशुभ भाव तर आर्त, रौद्र ध्यान आहे. शुभभाव धर्मध्यान आहे. जो शुद्ध ध्यान आहे ते आत्म्याचा आपला स्वभाव आहे. आत्म्याला आत्मामध्ये जाणणे- आत्मस्वरूपात राहणे किंवा आत्मस्वरूपाला आत्मा रूपात जाणणे शुद्ध स्वभाव आहे.
या तिन्ही भावनेला जाणणे श्रेयस्कर होईल.५१
आत्मभावनेच्या चिंतनाच्या पूर्वी जो साधक अनित्यादी वारा भावना, पाच महाव्रतांची पंचवीस भावनांच्या भावाचे जो चिंतन करतो. त्यास परिषह आणि उपसर्ग