________________
(६७६)
करण्यासाठी त्याचा उपक्रम, उद्यम किंवा पराक्रम शुद्ध असायला हवा. त्याचा अनुबंध निरंतर त्यात पुढे प्रगती करीत राहण्याची शृंखला शुद्ध असायला हवी असे झाले तरच साधना सिद्ध होते.
साधनेचा मार्ग म्हणायला अगदी सोपा आहे, परंतु प्रत्यक्ष आचरणात आणणे फारच कठीण आहे, तो शुद्ध भाव आणि शुद्ध योगावर आधारित आहे. भावनामध्ये आत्म्याचे शुद्ध स्वरूप प्रतिबिंबित होणे आवश्यक आहे. शुद्धात्मभावाच्या प्रतिबिंबामुळे क्रिया-प्रक्रियात शुद्धत्वचा समावेश होतो. कारण की तेथे संगमोह किंवा आसक्ती नसते. मात्र शुद्ध भावनेची निरंतरता म्हणजे श्रृंखला चालू राहिली पाहिजे. तसे झाले नाहीतर ती भावना भग्न होऊन सातत्य तुटते. हे त्रिविध शुद्ध अनुष्ठान आहे.
का शुद्धात्म भावनेचे या श्लोकात चित्रण झाले आहे. अध्यात्म योगाची सिद्धी शुद्धात्म भावना असली तरच संपन्न होते. तत्त्व दृष्टीने विचार केला तर आपला आत्मा पाच ज्ञानांचा स्वामी आहे. परंतु कर्मसंयोगाने विपरित भावात, अज्ञान भावात स्वतःच्या सत्तेत असलेल्या स्थितीला तो विसरला आहे. परंतु शुद्धात्म भावनेच्या चिंतनाने आणि शुद्ध आत्मभावाच्या अनुभावनेने आत्म-परिणामात किती उज्ज्वलता येते ! ज्ञानावरण इ. कर्म किती क्षय होऊन जातात. हे सूचित करताना महान अध्यात्मयोगी आचार्य कुन्दकुन्दांनी एक उदाहरण दिले आहे
शिवभति नावाचे एक मनी होते. ते परम वैराग्यवान निकटभवी होते. गुरूकडून दीक्षा घेतली व तप करू लागले. गुरूकडे शाखाध्ययन करीत होते. परंतु ज्ञानावरणीय कर्माचा क्षयोपक्षम न झाल्याने त्यांनी पाठ केलेले ज्ञान विसरून जात होते. लक्षात रहात नसे. म्हणून गुरूंनी त्यांना फक्त 'मा रूष'' एवढेचे शब्द पाठ करायला दिले. त्याचा अर्थ होतो. कुणावरही रोष करू नका. कोणावर नाराज होऊ नका. तसेच 'मा तुष' हे शब्द ही पाठ करायला दिले त्याचा अर्थ कुणावर तोष करू नका. तुष्ट बनू नका- थोडक्यात कुणावरही राग नाही लोभही नाही. अशी ‘मा तुष मा रूप' असे दोन बाक्य शिकवले. वास्तविक या शब्दाचा सत्यार्थ असा की तुम्ही आपल्या आत्मस्वरूपात लीन रहा. या दोन वाक्यांचा उच्चार करता-करता ती ही वाक्ये त्यांना विसरायला झाली. त्यांना फक्त तुषमाष' एवढेच लक्षात राहिले. पुढे एक असा प्रसंग आला की एक स्त्री सूपामध्ये उडीद टाकून ते पाखडीत होती. मुनींनी तिला विचारले, 'बाई, तुम्ही हे काय करीत आहात ?' ती म्हणाली 'मी तुषमाष वेगळे करत आहे म्हणजे मी उडादाची डाळ पाखडीत आहे