________________
योगीवर्य श्री आनंदघनजींनी श्रेयांसप्रभूचे स्तवन लिहिले त्यात लिहिले आहे - जो आपल्या स्वरूपाची क्रिया साधतो, अर्थात आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करतो, तोच आध्यात्माला प्राप्त करू शकतो. जो तशी बाह्य क्रिया करतो, त्यामुळे चार गतीमध्ये भमण करावे लागते ह्याला अध्यात्म म्हणताच येणार नाही. ती अध्यात्माची साधना नव्हेच, नाम अध्यात्म, स्थापना अध्यात्म द्रव्य अध्यात्म यांचा त्याग करून जो भाव अध्यात्माद्वारे आपल्या गुणांना साधतो. निजस्वरूपाचा साक्षातकार करतो तो अशा अध्यात्मात एकरूप होऊन जातो.४२
योगीवर्य आनंदघनजींनी शुद्धी सन्मार्जन किंवा परिष्काराच्या दृष्टीने आत्म्याचे विवेचन करताना लिहिले आहे की, संसारात जितके प्राणी आहेत त्या सर्वांचा आत्मा तीन भागात विभाजित आहे. १) बहिरात्मा २) अंतरात्मा ३) परमात्मा.
र परमात्मा आत्म्याची अविच्छेद किंवा अविनश्वर अवस्था आहे. शरीर वगैरे पौद्गलिक पदार्थांना आत्मस्वरूप समजणे ही आत्मस्थिती बहिरात्मभाव किंवा बहिरात्मदशा आहे. शरीर वगैरे नश्वर वस्तूतून आत्मबुद्धीला निवृत्त करून दैहिक प्रवृत्तीमध्ये फक्त साक्षी भाव ठेवणे अर्थात् शरीर व आत्मा भिन्न आहेत असा बोध घेणेही अंतरात्मभाव म्हणजेच अंतरात्मदशा आहे. परमात्मभाव, परमात्म अवस्था ज्ञानात्मक आनंदाने परिपूर्ण, परमपवित्र तथा समस्त कार्मिक उपाधीपासून परावृत्त आहे. अतिन्द्रिय-इन्द्रियातीत, इन्द्रियाने अगोचर आपल्या शुद्ध स्वरूपात्म मूलक गुणरूपी रत्नांची खाण आहे.४३
आनंदधनजींनी अशुभ आणि शुभाच्या पलीकडे जाऊन शुद्ध स्वरूपाकडे जाणारी आत्मा आहे. तिच्या कर्मोन्नत पथाचा त्रिविध आत्मस्वरूपाच्या दृष्टीने विवेचन केले आहे. बहिरात्मभाव शुभाशुभ अवस्था आहे. अंतरात्मभाव शुद्धत्वात संप्रतिष्ठित होण्याची स्थिती आहे. परमात्मभाव सर्वथा शुद्धोपयोगमय आहे. ते अध्यात्मसाधनेचे लक्ष्य आहे.
आनन्दघनजी भगवान पद्मप्रभूच्या स्तवनात प्रभूला संबोधित करून म्हणतात. हे नाथ, माझ्या आत्म्याला कर्मांचा योग झाला आहे. त्यामुळे तुमच्या व माझ्या आत्म्यात फरक झाला आहे. माझा आत्मा कर्माने गुरफुटून गेला आहे. आपला आत्मा कर्मापासून मुक्त आहे. गुण करण म्हणजे आत्मगुणांच्या विकासाने आत्म्यावर आच्छादित कर्माचा झालेला योग विनष्ट होईल. विद्वान मंडळींनी शास्त्रांच्या आधारावर सांगितले आहे की, आत्मगुणांचा विकास झाल्यामुळेच जे अंतर माझ्यात व तुझ्यात निर्माण झाले आहे ते अतर संपून जाईल. मी सुद्धा परमात्म स्वरूप बनून जाईन.