________________
(६७७)
त्यामुळे त्याची सालपट पुढे येतील व उडीददाळ मागे राहील. उडीददाळ व सालपट वेगवेगळी करत आहे. प्राकृतमध्ये उडीदला 'मास' आणि सालपटाला 'तुस' म्हणतात. हे ऐकताच त्या मुनींच्या चित्तात असा अर्थ स्फुरला की उडीद-मास आणि सालपट म्हणजे तस. हे दोन्ही जसे वेगळे आहेत त्याचप्रमाणे हे असार शरीर आणि आत्मा दोन्ही भिन्न आहेत. मग मुनी तुषमास भिन्न असे उच्चारण करू लागले. असे बोलता-बोलता त्यांना आत्म्याचा अनुभव येऊ लागला. आणि त्यात इतके लीन-मन-एकरूप झाले. एकाग्रता पराकोटीची वाढली. इतके अन्तर्मुख झाले की ज्ञानमय आत्म्यात अगदी डुंबून गेले. त्याच क्षणी चार घातीकर्मांचा नाश होऊन त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले.४७
भावनेची अशी ही विशुद्धी त्यामुळे त्यांना अपूर्व सिद्धी प्राप्त झाली. म्हणूनच अध्यात्माचा मूळ पाया प्रथम भावशुद्धी केली पाहिजे. यावरून असे सिद्ध होते की भाव शुद्धीची आत्मकल्याणाच्या दृष्टीने किती महत्त्वाची गोष्ट आहे. भावना शुद्ध नसली तर सर्व क्रिया व्यर्थच आहेत.
शुद्ध आत्मभावाची विशेषता सांगताना आचार्य कुन्दकुन्दपुढे लिहितात. भाव शुद्धीमुळे नग्न या निग्रंथ होतो. बाहरी नग्नता मूलक लिंगाने कसे कार्य साध्य होऊ शकेल ? कारण भाव युक्त द्रव्यलिंग द्वारा सुद्धा कर्मप्रकृतींचा नाश होतो.४८
भाव रहित शुद्धात्मभाव शिवाय केवळ नग्नत्वाने काहीच कार्य सिद्ध होत नाही. असे जिनेश्वर भगवंतांनी प्रतिपादित केले आहे. हे जाणून घेऊन हे धीर पुरुषा ! नित्य शाश्वत, शुद्ध, बुद्ध आत्मा आहे त्या आत्मभावाचेच निरंतर चिंतन करावे. देह इ.ची आसक्ती न करता तसेच मान वगैरे कषायापासून विमुक्त होऊन जेव्हा आत्मा, आत्मामध्येच मग्न राहतो तो साधू भावलिंगी-भाव साधू असतो. भावलिंगी साधू अशी भावना करतो, की चिंतन अनुभावन करतो की, मी ममत्वाचा परित्याग करून निर्ममत्वाचा स्वीकार करतो. आत्माच माझे आलंबन आहे, आश्रयस्थान आहे. आत्म्याशिवाय अन्य सर्व परभावांचा त्याग करतो. माझा आत्माच माझ्या ज्ञानात, दर्शनात आणि चारित्र्यात आहे. तेच माझे प्रत्याख्यान, संवर व ध्यान योग आहे. ज्ञान-दर्शन स्वरूप एकमात्र आत्माच शाश्वत आहे. या व्यतिरिक्त अन्य सर्व बाह्य भाव त्यापासून वेगळे आहेत. भिन्न आहेत. बाह्यभाव संयोगजनित आहेत. जर चार ही गतींचा शीघ्र त्याग करून शाश्वत आध्यात्मिक सुख किंवा मोक्ष सुख हवे असेल तर अत्यंत शुद्ध भाव ठेवूनच हे शक्य आहे. तेव्हा हे भवि ! शुद्ध कर्म मलरहित आत्मस्वरूपाची भावना करा, चिंतन करा. जो