________________
भगवन् ! जेव्हा माझ्या आत्मिक गुणांचा विकास होईल अर्थात कर्माचे आवरण दर होईल तेव्हा माझ्या व आपल्या आत्म्यात असलेला दुरावा दूर होईल. मंगलवाद्य बाजू लागेल. सर्वत्र मंगलच मंगल होऊन जाईल. माझा आत्मा परमानंद सागरात डुंबून जाईल. हा आनंद असा असेल जो कधीही परत जाणार नाही. शाश्वत असा हा एक मात्र आनंद आहे. एकदा आला की परत जात नाही. जन्ममरणाच्या चक्रव्यूहातून सोडविणारा असा हा आनंद आहे. ह्याचे वर्णन शब्दातीत आहे.४४
आचार्य कुन्दकुन्दांचा हाच उपदेश आहे की, हे आत्मन ! तू या ज्ञानानंद स्वभावी आत्म्यातच नित्य रमून रहा, यातच नित्यसंतोषाला प्राप्त हो आणि यातच तृप्तीचा अनुभव कर. तर तुला खरे उत्तम सुख प्राप्त होईल.
संपूर्ण जगाकडे असलेली दृष्टी हटवून एकमात्र आपल्या आत्म्याची साधना करा. आराधना करा. फक्त आत्म्याला जाणा. ओळखा, आत्म्यातच रममाण व्हा. यामुळे अतिन्द्रियानन्दाची प्राप्ती होईल. परमसुख प्राप्त करण्याचा हाच एकमात्र उपाय आहे.
आचार्य हरिभद्रसूरी जैनजगताचे महान विद्वान आणि अध्यात्मयोगी होते. त्यांनी जैनधर्माचा जो प्रचार प्रसार केला, खरोखरच ते गौरवास्पद आहेत. त्यांनी कितीतरी ग्रंथ लिहिले आहेत. जैनयोग-अध्यात्मयोगावर त्यांनी 'योगदृष्टी समुच्चय' तथा 'योगबिंदू' नावाचे दोन ग्रंथ संस्कृतमध्ये व 'योगशतक' आणि 'योगविंशिका' नावाची दोन पुस्तके प्राकृतमध्ये लिहिली आहेत. या चारही ग्रंथात अध्यात्मयोग-आत्मा कशाप्रकारे परमात्म भावाचा साक्षात्कार करू शकतो याचे यौगिक पद्धतीने वैज्ञानिक युक्तियुक्त विवेचन केले आहे.
__योगबिन्दुमध्ये एके ठिकाणी योगाचे सहकारी हेतूंचे वर्णन करताना लिहिले आहेत्रिविध शुद्ध अनुष्ठान, सत्शास्त्राच्या आज्ञेप्रमाणेच आचरण, सम्यक्त्वात दृढ़ विश्वास याने
आध्यात्मिक योग साधनामध्ये साधक प्रगतीशील राहतो. तीन प्रकारचे शुद्ध अनुष्ठानाचे वर्णन करताना ग्रंथकार लिहितात
१) शुद्ध विषय म्हणजे शुद्ध लक्ष्य, २) शुद्ध उपक्रम,
३) शुद्ध अनुबंध हे तीन प्रकारचे अनुष्ठान शुद्ध असले तर अनुष्ठान किंवा आचरणाची शुद्धता येते.४६ ।।
ग्रंथकाराचा इथे हा भाव आहे की साधना करण्याऱ्या व्यक्तीने सर्वात प्रथम आपल्या ध्येयरूपात शद्धआत्मभाव ग्रहण करायला पाहिजे. शुद्धभावाचा साक्षात्कार