________________
(६७९)
सहन करण्याची शक्ती जागृत राहते. भाव शुद्ध राहतात. भावाशिवाय केवळ बाह्य लिंग वेष इ. नी काय सिद्ध होणार ?५२
ज्याप्रमाणे सोन्याला शुद्ध आणि निर्मल करण्यासाठी विशेष प्रक्रिया करावी लागते तेव्हा ते पाषणातून शुद्ध बनते. त्याचप्रमाणे कालादी लब्धी अर्थात द्रव्य, क्षेत्र, काल, भावरूप सामग्री प्राप्त करून अनादी कर्म संयोगामुळे अशुद्ध बनलेला आत्मा परमात्म भाव प्राप्त करतो.५३
____ जो संसाररूपी भयानक महासागरातून बाहेर पडू इच्छितो, त्याने शुद्ध आत्म स्वरूपाचे ध्यान करावे ज्यामुळे कर्मरूपी इंधन जळून जाईल. ध्यानात स्थित साधक सर्व प्रकारचे कषाय गर्व अहंकार मद, राग-द्वेष, मोह इ. सर्वांचा त्याग करून लोकव्यवहारापासून विरक्त होऊन शुद्ध आत्म्याचे ध्यान करतो.
पर द्रव्यात, आत्मेतर पदार्थात राग (रुची) ठेवतो. ते संसारात जन्ममरण आवागमनाचे हेतू रूप आहे. म्हणून योगीवृन्द निरंतर आत्म्याचीच भावना करतात.३५
भरतक्षेत्रात या पंचमकाळात ज्ञानीमुनींना धर्मध्यान आहे. आत्मस्वभावात स्थित जो ज्ञानीमुनी असतो त्याला धर्मध्यानाने उच्च गती मिळते. परंतु ज्यांचा यावर विश्वास नाही ते अज्ञानी आहेत. या पंचमकाळात रत्नत्रयाची (ज्ञान, दर्शन, चारित्र) साधना करून शुद्ध, पवित्र झालेले, आत्म्याचे ध्यान करूनच इन्द्रादी देव पद प्राप्त करतात व मग तेथून च्यूत (मृत्यू) होऊन आयुष्य पूर्ण करून मनुष्य जन्म धारण करतात आणि मोक्ष प्राप्त करतात.५६
__ जे लोकमध्ये नमस्कार करण्यास योग्य चक्रवर्ती इ. राजा द्वारा तथा सुरेंद्रद्वारा निरंतर नमन करण्यास योग्य ध्यान करण्यास योग्य, आहेत तथा स्तुती करण्यास योग्य आहेत ते तीर्थंकर इ. सुद्धा शुक्लध्यान द्वारा ज्यांचे ध्यान व स्तवन करतात असा आत्मा शरीरात स्थित आहे. तो अपूर्व अचिन्त्य महात्म्य युक्त आहे. ह्या आत्म्याला जाणा, अनुभव करा. त्यात श्रद्धा ठेवा, रुची ठेवा आणि आपल्या आत्म्यात रमण करा.
__ अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू परमपद शुद्ध आत्म्याच्या शुद्ध सहज स्वरूपात स्थित असल्यामुळे परश्रेष्ठी आहेत. जो आत्म्यात आत्म्याच्या शुद्ध सहज अवस्थेत स्थित आहे, असा आत्माच माझ्यासाठी शरण रूप आहे.
सम्यग् दर्शन, सम्यग्ज्ञान, सम्यगचारित्र, सम्यगतप- ह्या चारही आत्म्याच्या अवस्था आहेत. म्हणून आत्माच शरणरूप आहे. साधकाने असे चिंतन करावे.५७