________________
(६८१)
अत्यंत सूक्ष्म, सुन्दर भाव चित्र यात अंतिक केले आहे.
ज्याप्रमाणे सोन्याला अग्नीत तापवले की त्याचा कडकपणा दूर होऊन ते पातळ होते ह्याचप्रमाणे काम, क्रोध, विषाद, मत्सर, मद, द्वेष, प्रमाद इ.ने मनाची स्थिरता टिकत नाही. शुद्ध ध्यानात हे विकार आडवे येतात. म्हणून ध्यानाचा अभ्यास करणाऱ्या योगीने या विषय विकारापासून सतत सावधानतेने राहिले पाहिजे. ६१
ध्यानात मानसिक स्थिरता परमावश्यक आहे. ध्यान करतेवेळी जर मनात काम, क्रोध, विषाद इ. युक्त अशुद्ध भावना असली तर ध्यानातील स्थिरता नष्ट होते. मानसिक एकाग्रता नष्ट होते. मनाची एकाग्रता झाली तरच ध्यान होऊ शकते. एकाग्रता नसेल तर ते ध्यानच नव्हे.६२
ज्या साधकाने भोगस्पृहाचा, विषयवासनाचा त्याग केला आहे तोच या दुर्वाह, दुरुह मोठ्या मुश्किलीने वश होणाऱ्या माकडासारख्या चंचल मनाला, जो इंद्रियांच्या भोगरूपी वनात विचरण करतो त्यास हृदयात स्थिर करून लोक प्रवाहापासून विमुक्त होण्यासाठी ध्यानाचा अभ्यास करतो. कारण निश्चितपणे उपाय केल्याशिवाय विधिक्रम केले जातात त्याच्याने सफलता प्राप्त होत नाही. ६३
मानसिक चंचलता ध्यानाची स्थिरता टिकू देत नाही. मन अतिचंचल आहे. ते तेव्हाच नियंत्रित होऊ शकेल जेव्हा मनातील भोगाभिलाषा नष्ट होतील. कारण त्यामुळेच तर संसाराचा प्रवाह - कर्माश्रव गतिशील आहे. त्याचा निरोध केल्याशिवाय ध्यान सिद्ध होणार नाही. कोणतेही कार्य करायचे म्हटले म्हणजे त्यात कार्यानुरूप शिस्तबद्ध क्रिया व साधन असायलाच पाहिजे. इथे संवराने अर्थात आश्रव निरोधपूर्वक शुद्ध भावनेचे चित्रण केले आहे.
मी शीर्यवान आहे, प्रशस्त बुद्धिवादी आहे. निपुण, कुशल, प्रवीण आहे. सर्वात ज्यास्त वैभवशाली आहे, सन्माननीय आहे. गुणवान आहे, लोकांमध्ये अग्रगण्य आहे. अशाप्रकारच्या अप्रशस्त कल्पनेचा परित्याग करून निर्मल शाश्वत आत्मतत्वाचे तुम्ही ध्यान करा ज्यामुळे मोक्षरूपी लक्ष्मी प्राप्त होते. ६४
आत्माकर्मोदयामुळे विविधप्रकारचा स्थूल, सूक्ष्म, दीर्घ इ. देहद्वारा प्रकट रूपात संबद्ध असूनही कधी विकारी बनत नाही. अर्थात शुद्ध स्वरूपात कोणतीही विकृती येत नाही. या शरीराला लाल, पिवळे, पांढरे इ. विविध रंगाच्या बखांनी सुशोभित केले तरी
1
त्या आत्म्याता रंगाने काही प्राप्त होत नाही ६५