________________
(६४६)
होतो. या माध्यरन्थ्य भावनेला धारण करणारे महामुनी सर्वप्रकारच्या विचारात, वचनात मध्यस्थ भाव ठेवतात. त्यांच्या मनाची परिणती अनेकांत दृष्टीयुक्त असते. परिणतीशिवाय कप्ततत्त्वाचा यथार्थ निर्णय संभव नाही. उत्सर्ग अपवाद, निश्चय-व्यवहार, ज्ञान-क्रिया, तथा विधि-निषेध इ. सर्वदृष्टिकोनांना ते महापुरुष सापेक्षरूपाने ग्रहण करतात. ते आगमिक पदार्थाना आगमातून आणि युक्तीयुक्त पदार्थांना युक्तीने ग्रहण करतात.
ज्याप्रमाणे हजारोंच्या संख्येत शंभराच्या संख्येचा समावेश आहेच, त्याचप्रमाणे अन्य दर्शनातील सद्विचारांना ते महामुनी आपल्या दर्शनात समाविष्ट करून घेतात. त्याचे चिंतन हे अनेकांतचे असते. आणि शुभभावनेने त्यांचा प्रत्येक विचार पवित्र असल्याने कोणत्या वेळी कोणता विचार पुढे ठेवल्याने स्व-पर हित होते याचा सर्वंकष विचार करूनच ते बोलतात.
- माध्यस्थ्यतामुळे त्यांचे वचन सागरापेक्षाही अधिक गंभीर आणि चंद्रापेक्षाही अधिक सौम्य असते. केवळ सत्याचेच पक्षपाती असल्यामुळे त्यांच्यात स्वदर्शनाबद्दल राग अथवा पर दर्शनाबद्दल द्वेष नसतोच.१०३ जेव्हा साधक उपेक्षाभावात निष्णात होऊन जातो तेव्हा हर्ष आणि विषाद, सुख व दुःख, सम्मान व अपमान इ. द्वंद्व सहजपणे क्षीण होऊन जातात.
__ कोणत्याही जीवाचा कधी द्वेष केला असेल तर तो महाभयंकर दोष आहे. द्वेष केल्याने आत्मा समभावात कधीच राहू शकत नाही. आणि समभावाशिवाय तर सर्व क्रिया निष्फल होऊन जातात. अशा कुणाला उपदेश दिला तरी त्याचा परिणाम चांगला होत नाही. अशा वेळी माध्यस्थ्य राहणेच योग्य आहे.
___ जो साधक माध्यस्थ्य भावनेत राहू इच्छितो त्याने आपल्या विचारांशी ताळमेळ बसत नसलेल्यांना सहन करण्याची, ते पचवण्याची शक्ती वाढवली पाहिजे. माझे म्हणणेच खरे आहे, इतरांचे नाही. अशा एकान्तिक विचारांच्या मोहात पडणे माध्यस्थ्य भावनेसाठी घातक आहे. पुष्कळवेळा मनुष्य अमुक जाती, धर्मसमुदाय, प्रान्त इ. कारणाने पूर्वग्रहामुळे दुसऱ्या व्यक्तींना हीन, निकृष्ट, पापी समजतो हा विचार सुद्धा माध्यरथ्य भावनेतील अडथळा आहे.
पापी व दुष्टांचे पाप आणि दोष नष्ट करावे. त्या व्यक्तीला नष्ट करण्याची आवश्यकता नाही. माध्यस्थ्य भावनाशील असण्याऱ्यांचे कार्य एका चिकित्सकासारखे असाच. चिकित्सक भयंकराहन भयंकर रोग्याने ग्रस्त रोगीला पाहून त्याची घृणा किंवा