________________
(६६२)
उत्तराध्ययन सूत्रात म्हटले आहे की, आत्माच सुख-दु:ख उत्पन्न करतोही आणि करतही नाही. अर्थात सुख व दुःख आपल्या कर्माच्या परिणामाप्रमाणे मिळतात. दुसरा कोणीही सुख दुःख देऊ शकत नाही. सुप्रस्थित आत्मा उत्तम श्रेष्ठ कर्मात संलग्न आत्मा आपला मित्र आहे. तथा दुःप्रस्थित दुष्कर्मात संलग्न आत्मा आपला शत्रू आहे. ३
आगमकार जिज्ञासूंना सुबोधित करून म्हणतात की आपल्या आत्म्याशी युद्ध करा. आपल्या आत्म्याच्या दूषित व पापपूर्ण वृत्तींशी संग्राम करा, त्यांना नष्ट करा. बाह्ययुद्ध - ज्यांना आपण शत्रू मानतो अशा माणसांशी युद्ध - करण्यात काय अर्थ 1 त्यामुळे तर शत्रुत्व वाढेल. दोषयुक्त किंवा सावध पापाचरण युक्त आत्म्याशी लढणे जरूरीचे आहे. ४
मोठ्या मुश्किलीने जिंकण्यायोग्य संग्रामात हजारो-हजारो शत्रूंना जिंकण्यापेक्षा आपल्या आत्म्याता जिंकणे फार मोठा विजय आहे. जो आत्मविजय करू शकतो तो एक फार मोठी लढाई जिंकतो.
जो आत्म्याच्या स्वरूपाला चांगल्याप्रकारे जाणून घेतो तो समस्त जगाला जाणू शकतो. जो एकाला जाणतो तो सर्वांना जाणतो. ५
आत्म्याला जो जाणतो, समजतो, अनुभूती प्राप्त करतो, तो आत्मेतर पदार्थांना सहजपणे जाणतो. कारण त्यांना समजल्याशिवाय त्यांच्यापासून भिन्न असलेल्या आत्म्याचा बोध प्राप्त होऊ शकत नाही.
एक आत्म्याच्या स्वरूपाला जाणण्याचा अभिप्राय सर्वांना जाणून घेतले पाहिजे. आत्म्याशिवाय अन्य कोणते द्रव्य आहेत हे समजल्यानंतरच आत्म्याला समजून घेणे सार्थक होते. कारण संसारावस्थेमध्ये आत्मा अन्य पदार्थांशी संलग्न आहे. वास्तविक आत्मा आपल्या शुद्ध स्वरूपात सर्वथा एकाकी आहे. परंतु कर्मबद्ध अवस्था असल्यामुळे त्याचे आस्तित्व शुद्ध स्वरूपात समजत नाही. म्हणूनच तर आत्मज्ञान सर्वसापेक्ष आहे. सर्वसापेक्षतापूर्वकच आत्मज्ञान साध्य होते.
जो आत्मा ऋजू आहे. ऋजुता म्हणजे सरलता, सरलता ज्याच्यात आहे त्यालाच सिद्धअवस्था प्राप्त होते. कुटिलता ज्याच्यात आहे त्याची आत्मशुद्धी कशी होणार ? शुद्ध आत्म्यामध्येच धर्म टिकतो. अर्थात आंतरिक शुद्धतेशी धर्माचा संबंध आहे. धूररहित ज्योत जसा प्रकाश देते त्याचप्रमाणे शुद्ध आत्मा स्वतःच्या तेजाने उद्दीप्त होते. आणि ते परमनिर्वाणपद समस्त कर्मापासून मुक्तता प्राप्त करून घेते. ७