________________
(६६४)
काय उपयोग ! जो आंधळा आहे त्याच्या समोर करोडो दीपकांच्या माळा लावल्या तर तो काय प्रकाश पाहू शकतो ?
जीवनात चारित्र्याला अतिशय महत्त्व आहे. चारित्र्यशून्य ज्ञानाला काडीइतकेही महत्त्व नाही. वास्तविक सार्थकता आहे चारित्र्य क्रियान्वित होण्यात. शास्त्राचे ज्ञान जरी अल्प असेल तरीही चारित्र्यवान साधक त्या ज्ञानप्रकाशाला उद्युक्त करणारा ठरेल. एक दीपक त्याला प्रकाश-किरण देऊ शकेल. ज्ञानच त्याचे चक्षू आहेत.
चक्षूचा अर्थ आहे आत्म्याची शुद्धी अनुभवित होण्याचा दृष्टिकोन. तीच खरी नेत्र-ज्योती. जी आत्मज्योती बनू शकते.
भगवान महावीरांच्या उपदेशात आत्म्याचा जो आवाज आहे तो आपल्या आत्मस्वरूपाला ओळखण्यास व आत्मस्वरूपात लीन होण्यात सहायक आहे.
__ आगमोत्तरकाळात आत्म-भावना आगम ग्रंथांमध्ये आत्म्याच्या शुद्ध स्वरूपासंबंधी जे विवेचन केले आहे, आगमोत्तर काळात त्याच भावनेचे विस्तृत रूपात विवेचन आहे. अशुभाकडून शुभ आणि शुभाकडून शुद्ध बनण्याचा आत्मपराक्रम प्रत्येक मुमुक्षू आत्मा क्रमशः करतो. अशुभ वगैरेची व्याख्या करताना अष्टप्राभृतमध्ये दिगम्बर आचार्य श्री कुन्दकुन्द लिहितात- भावनेचे अशुभ, शुभ आणि शुद्ध असे तीन भेद आहेत. अशुभोपयोग पापजनक आहेत. शुभ पुण्योत्पादक आहेत. शुद्धोपयोग अतीत आहे.१३
___ एका मुमुक्षू व्यक्तीच्या आराधने चा क्रम असा असतो - प्रथम तो अशुभपयोगापासून शुभोपयोगात येतो. हिंसा, असत्य, चोरी, मैथुन व परिग्रह इत्यादींशी संबंधित पापोत्पादक वृत्तींना सोडून तो पुण्यजनक दया, करुणा, सेवा, स्वाध्याय, भक्ती इत्यादी पुण्य कार्यात मग्न होतो. जरी शुभ अशुभापेक्षा उत्तम आहे, तरीही शुभसुद्धा बंधनकारक आहे. मुक्तावस्थाप्राप्त करण्यासाठी अशुभबंधन तर नकोच पण शुभबंधन पण त्यागावे लागतात. तेव्हाच मुक्तावस्था प्राप्त होते. म्हणूनच आचार्यांनी शुभाकडून शुद्धाकडे जाण्याची प्रेरणा दिली आहे.
अशुभ, शुभ आणि शुद्ध स्वरूपाचे चिंतन करून क्रमशः अशुभ आणि शुभ याचे चिंतन करता-करता शुद्धावस्थेत प्रवेश करण्याचे चिंतन, अनुशीलन करणे शुद्धभावना आहे. बारा भावनांमध्ये यांचा नामोल्लेख नाही झाला. परंतु एकत्व, अन्यत्व, संवर, निर्जरा इत्यादी भावना अशा आहेत ज्यांना शुद्धाबरोबर जोडल्या जाऊ शकतात. आत्मा एक