________________
(६६६)
अशा भावनेने युक्त असलेल्या व्यक्तीला मृत्यूची चिंता होत नाही. त्याला चिंता असते ती आत्म्याच्या हिताची. मृत्यूनंतर पुढे कुठे जाऊ त्याची, आणि त्यासाठीच भाव विशुद्धी करण्याचे लक्ष्य असणारा साधक आपली जीवनयात्रा सार्थक करण्याचा प्रयत्न करतो. जा आचार्य कुन्दकुन्दांनी 'प्रवचनसार' ग्रंथामध्येसुद्धा शुद्ध भावाचे अनेक प्रकाराने विवेचन केले आहे. ते लिहितात- आत्मा परिणाम स्वभावमय आहे. म्हणून जेव्हा तो शुभ किंवा अशुभ भावात परिणत असतो तेव्हा तो शुभ किंवा अशुभ होऊन जातो आणि जेव्हा शुद्ध भावात परिणत होतो तेव्हा तो शुद्ध होतो.
जेव्हा हा आत्मा शुभ किंवा अशुभ रागभावात परिणमित होतो तेव्हा जवाकुसुम किंवा तमाल पुष्पासारखे लाल किंवा काळ्या रंगरूपात परिणमित स्फटिकाप्रमाणे परिणमन स्वभावयुक्त असल्यामुळे शुभ किंवा अशुभ होतो आणि जेव्हा तो शुद्ध अराग भावाने परिणमित होतो तेव्हा शुद्ध अराग परिणत-रंगरहित स्फटिकाप्रमाणे शुद्ध होतो. अशाप्रकारे शुभत्व, अशुभत्व आणि शुद्धत्व सिद्ध होते.
अभिप्राय असा की आत्मा सर्वथा कूटस्थ नाही. परंतु स्थिर राहून परिणमन करणे हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून तो ज्या-ज्या भावनेत परिणमित होतो तो तसाच स्वतःही होऊन जातो. परंतु आत्मा स्वभावाने स्फटिक मण्याप्रमाणे निर्मल आहे, जेव्हा दान, पूजा, मूलगुण, उत्तरगुण इ. शुभ अनुष्ठानरूप शुभोपयोगात परिणत होतात, तेव्हा तो स्वतः सुद्धा शुभ होऊन जातो. जेव्हा मिथ्यात्व इ. अशुभोपयोगात परिणमित होतो तेव्हा स्वतः सुद्धा अशुभ होतो आणि आपल्या स्वभावरूप रत्नत्रयात्मक शुद्धोपयोगात परिणत होतो तेव्हा स्वतः शुद्ध होतो.
परा(अन्य)बद्दल शुभ परिणाम पुण्य आहे. आणि अशुभ परिणाम पाप आहे जो दुसऱ्याबद्दल प्रवर्तमान नाही असे परिणाम वेळेवर दुःख क्षयाचे कारण आहे.२०
इथे आचार्य कुन्दकुन्दांच्या म्हणण्याचा मतितार्थ असा आहे की, परिणाम दोन प्रकारचे आहेत. १) परद्रव्य प्रवृत्त २) स्वद्रव्यप्रवृत्त.
परद्रव्य प्रवृत्त विशिष्ट परिणामाचे दोन प्रकार (भेद) आहेत. १) शुभपरिणाम आणि २) अशुभ परिणाम. यात पुण्यरूप पुद्गल बंधाचे कारण असल्यामुळे अशुभपरिणाम पाप आहे.
स्वद्रव्य प्रवृत्त अविशिष्ट परिणाम तर शुद्ध असल्यामुळे एक आहे. ते यथाकाळ