________________
नाही त्याने अनात्माला पण जाणलेच नाही. अशा प्रकारे जीव आणि अजीव ज्याने जाणले नाही तो सम्यकदृष्टी कसा असू शकेल ?२९
ज्याप्रमाणे शंख वेगवेगळ्या प्रकारचे सचित-अचित मिश्रित द्रव्यांना भोगतो तरीही शंखाचा श्वेतभाव पांढरेपणा काळा होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे सचित-अचित मिश्रित द्रव्यांचा भोग करूनही ज्ञानीचे ज्ञान, अज्ञान होऊ शकत नाही. जेव्हा तो शंख सफेदपणा सोडून कृष्ण (काळा) पणा स्वीकारतो तेव्हा त्याचे शुक्लत्व तर जातेच. त्याचप्रमाणे ज्ञानी जेव्हा आपल्या ज्ञानस्वरूप स्वभावाला सोडून देतो तेव्हा तो अज्ञानात परिणत होतो. म्हणजे अज्ञानी होऊन जातो.३०
ही चर्चा आत्म्याच्या शुद्धभावनेशी संबंधित आहे. जेव्हा आत्माशुद्ध भावात संप्रतिष्ट असतो तेव्हा तो सांसारिक पदार्थांचा भोग भोगत असतानासुद्धा अज्ञानावृत्त होत नाही. जेव्हा तो शुद्ध भावापासून परावृत्त होतो तेव्हा तो शुभाशुभ भावात गुंततो. ज्ञानीयांच्या बाबतीतसुद्धा हे तत्त्व लागू आहे, जेव्हा तो ज्ञानमय स्वभावाला सोडून देतो व अज्ञानात परिणमित होतो अर्थात् अशुद्ध अवस्थेत जातो.
शुभ आणि अशुभ दोन्हींची अशुद्धच अवस्था आहे. कारण की दोन्हीमध्ये पुण्यपापात्मक बंध गतिशील असतात.
आचार-आचारांग इ. सूत्र ज्ञान आहे. जीवादी तत्त्वदर्शन आहे आणि सहा जीवनीकाय चारित्र आहे. चारित्र्याचा आश्रय आहे. हा व्यवहार झाला. निश्चयनयाच्या दृष्टीने आपला आत्माच ज्ञान आहे. तोच दर्शन आणि चारित्र आहे. आत्माच प्रत्याख्यान, त्याग आहे. आणि आत्माच संवर व योग समाधी हे ध्यान आहे.३१
हे विवेचन सुद्धा निश्चयनय या शुद्धोपयोगाशी संबंधित आहे.
स्फटिक मणी स्वतः शुद्ध आहे. तो अन्य रंगात कधीच समाविष्ट होत नाही. परंतु जेव्हा तो अन्य रंगामुळे त्यात मिसळतो तेव्हा तो त्या रंगाचा दिसतो. त्याचप्रमाणे ज्ञानी स्वतः शुद्ध आहे. तो स्वतः रागादी रूपात कधी परिणत होत नाही. परंतु तो अन्य रागादी दोषांमुळे रंजित होतो तेव्हा तो तसा प्रतीत होतो. ज्ञानी-राग-द्वेष मोह आणि कषाय भावांमध्ये कधी रममाण होत नाही. तो आपल्याकडून त्या भावनेचा कर्ता बनत नाही.३२
___ शुद्धोपयगात रागद्वेष, कषाय इ. नसतात. राग-द्वेष आणि कषायादींची जिथे परिणती होते तेथे शुद्धोपयोग नष्ट होतो.