________________
(६७१)
जो बंध आणि आत्म्याच्या स्वभावाला जाणतो व भेद विज्ञानद्वारा बंधापासून ३३ विरक्त होतो तो कर्मांना नष्ट करतो. त्याचे कर्म गळून पडतात.
सर्व भाव परके आहेत हे समजल्यावरसुद्धा कोण ज्ञानी आपल्या आत्म्याच्या शुद्ध स्वरूपाला अशुद्ध भावात गुंतवेल ? त्या पर भावानेला आपले म्हणेल १३४ जेव्हा आत्मा अनंत कर्म फळांचा त्याग करतो तेव्हा कोठे तो विमुक्त ज्ञाता व दृष्टा बनू शकतो. ३५
कर्माबद्दलची फलासक्ती सोडल्यानंतर फक्त ज्ञानी भाव राहतो. कर्ताभाव राहतच नाही. ही शुद्धोपयोगाची स्थिती आहे.
शुद्धोपयोगाचे विशेष वर्णन करताना आचार्य कुन्दकुन्द लिहितात- पूर्वकृत खूप अधिक प्रमाणात शुभाशुभ कर्मापासून जो आत्मा स्वतःला निवृत्त करतो- ते आहे प्रतिक्रमण.
भविष्यकाळात जे अनेक प्रकाराने शुभाशुभ कर्माने जो आत्मा भावात्मक रूपाने बद्ध आहे त्या भावात्मक बंधनापासून निवृत्त होणे, ते आहे प्रत्याख्यान.
वर्तमानकाळात उदयास आलेले अनेकप्रकारचे शुभाशुभ कर्माच्या दोषांना आत्मा अनुभव करतो, ज्ञानी भावनेने जाणतो अर्थात् त्याचे कर्तृत्व किंवा स्वामीत्व आपल्याकडे घेत नाही ती आहे आलोचना.
जो आत्मा अशाप्रकारे नित्य प्रत्याख्यान घेतो, प्रतिक्रमण करतो तथा आलोचना करतो तो आत्मा वास्तविक चारित्रयुक्त आहे. ३६
प्रतिक्रमणा, प्रत्याख्यान आणि आलोचना जैनदर्शनातील अतिशय महत्त्वपूर्ण शब्द आहेत. हे आचार विधीच्या अंतर्गत आहेत. साधक त्यांचे दिलेल्या पाठाप्रमाणे अनुवर्तन करतो. हा त्याच्या दैनंदिन क्रियाचाच एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आचार्य कुन्दकुन्दाच्या म्हणण्यानुसार हा व्यवहार नय आहे. निश्चयनय किंवा शुद्धोपयोगाची भूमिका पृथक आहे. त्यानुसार आत्मभावात परिणित झाल्याने म्हणजेच विभावापासून परावृत्त होऊन स्वभावात आले तरच त्या क्रियांचा उपयोग होतो. जोपर्यंत अतीत, भविष्य आणि वर्तमानाशी संबंधित शुभाशुभ भावामुळे जे विविधरूपात निष्पन्न होतात, आंतरिक दृष्टीने आत्मा आपल्या स्वतःला पृथक करीत नाही, तोपर्यंत या क्रिया निश्चय रूपात सिद्ध होत नाही. प्रतिक्रमण म्हणजे आपल्याकडे परत येणे. आपल्या स्वतःकडे परत येणे म्हणजे