________________
तो ज्ञातृभावाने युक्त असतो. सम्यग्दृष्टी रागरहित असतो आणि हे उदयाला आलेले कर्म आहेत हे त्याला समजते. म्हणून त्याबद्दल राग-द्वेष त्याच्या मनात उत्पन्न होत नाही. राग-द्वेष व मोहाशिवाय भोगोपभोगाची सामग्री भोगतो त्याला कर्माचे आश्रव होत नाही. असे झाले म्हणजे पुढे कर्मबंध होत नाहीत. उदयास आलेले कर्म आपला प्रभाव पाडून निर्जीर्ण होतात. कारण उदयास आल्यानंतर कर्मफल दिल्यानंतर कर्माची सत्ता उरतच नाही.
तात्पर्य हे की नव्या कर्माचे बंध होत नाहीत आणि उदयास आलेले कर्म निर्जीर्ण होऊन जातात. अशाप्रकारे निर्जराच होते. म्हणून रागरहित सम्यग्दृष्टी असणाऱ्याला भोगोपभोग केले तरी कर्मनिर्जराचे ते निमित्त असते. कारण पूर्वसंचित कर्म उदयास येऊन झडून जाते, क्षीण होते ही द्रव्य निर्जरा आहे.
द्रव्यांचा उपभोग करण्याने निश्चितपणे सुख किंवा दुःख होतेच. उदयास आलेले सुख-दुःख तो अनुभव करतो. ते सुख-दुःखरूप भाव भोगल्यानंतर निर्जीर्ण होतात.२८
सी परद्रव्य जेव्हा भोगले जाते तेव्हा त्यांच्या निमित्ताने सुखात्मक किंवा भावात्मक भाव नियमतः उदित होतात. कारण की, साता आणि असातामूलक संवेदन या दोन प्रकारांचे तिथे अतिक्रमण होत नाही. ते अनुभवाला येतात. मिथ्यादृष्टी असलेल्यासाठी रागादी भावामुळे ते बंधाचेच कारण असतात. म्हणून निर्जीर्ण होऊनही वास्तवात तेथे निर्जरा होत नाही. बंधच होतो. सम्यग्दृष्टी असलेल्यासाठी रागादींच्या अभावामुळे ते बंधाचे निमित्त होत नाही. निर्जीर्ण झाल्यामुळे ते निर्जरारूपच रहातात.
हा श्लोक ह्यापूर्वीच्या श्लोकाला पूरकच आहे. सुख-दुःखाचा भोग असूनही निर्जरा न होणे हे पूर्वी कथन केले गेले आहे. ह्या श्लोकात एका विशेष गोष्टीचा उल्लेख आहे की उदयास आलेले शुभाशुभात्मक, सुखदःखात्मक कर्म भोगल्यावर नष्ट होतात. परंतु मिथ्यात्वीचे कर्म नष्ट झाले तरी त्याला निर्जरा म्हणता येणार नाही. पर शुभभाव आणि शुद्धभावाचा भेद ह्या वर्णनात समजू शकतो. जेथे शुद्ध भाव असतो तेथे दर्शन सम्यकत्व असते. परंतु शुभ भाव सम्यक आणि असम्यक दोन्हीत असू शकतो. म्हणून संक्षेपात असे सांगू शकू की शुभ ऐहिक, लौकिक सुखात्मक बंध आहे आणि शुद्ध अलौकिक निर्बंध मुक्त अवस्था आहे.
ज्याचे अनुमात्र पण रागादीचा सद्भाव आहे, ज्याचे परमाणू इतकेच स्वल्प पण राग भाव विद्यमान आहे, त्याने आत्म्याला जाणलेच नाही हे सिद्ध होते. जरी समस्त जागमाचे ज्ञान त्याला असले पण आत्मा नाही जाणला आणि जो आत्मा समज शकला