________________
(६६७)
संसार दुःखाचे हेतुभूत कर्म पुद्गलाच्या क्षयाचे कारण असल्यामुळे संसारदुःखाचा हेतू भूतकर्म पुद्गलाचे क्षयस्वरूप मोक्षच आहे.
आचार्य पूज्यपाद म्हणतात- जो शरीर, वाणीमध्ये आत्म्याचे संधान करतो त्यांना आत्म्याची अनुभूती होते ती भ्रांत किंवा अज्ञानाने युक्त असते. जो आत्म्याच्या अमूर्तत्व ज्ञानानंदमय स्वभावाला जाणत नाही तोच अनेक विकल्पामध्ये गुरफटून राहतो. परंतु जो शरीर आणि वचन यांना आत्मा समजतो तो भ्रान्त आहे. सदज्ञान युक्त तो आहे, जो आत्म्याच्या वास्तविक स्वरूपाला जाणतो. २१
जोपर्यंत व्यक्ती आत्म्याला शरीराहून वेगळा मानत नाही, आत्म्याच्या सत्य स्वरूपाला जाणण्याची भावना करीत नाही, त्याच्या शुद्ध स्वरूपाला समजून घेत नाही, तोपर्यंत गुरू इत्यादींच्याकडून बरेच काही ऐकतो. व्याख्यान श्रवण करतो तरी तो मोक्षाचा अधिकारी होऊ शकत नाही. कारण श्रवण वरवरचे असते. ते आत्म्याला स्पर्श करीत नाही. आत्म्याला तेव्हा स्पर्श होईल जेव्हा खरे आत्मस्वरूपाची अनुभूती होईल. पुष्कळ ऐकले व कथन केले म्हणजे खरा धर्मात्मा आहे असे नाही. हे बाह्य स्वरूपाचे ज्ञान आहे. बाह्य क्रियाकांड मात्र आहे. आत्मिक ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सर्व व्यर्थ आहे. साधकानेही भावना करावी की, आत्मा आपल्या स्वरूपात स्थित आहे. तो स्वप्नातही शरीराला आत्मा समजत नाही. २२
जो परमार्थापासून दूर आहे, अशुद्ध आहे, ज्ञानस्वरूप आत्मामध्ये ज्यांना श्रद्धा नाही ते कितीही व्रत, नियम, तप व शील पालन करीत असले तरी निर्वाण (मोक्ष) प्राप्त करू शकत नाही. ते अज्ञानाने पुण्याची इच्छा करतात. जे संसार भ्रमण वाढविणारे आहे ते मोक्षाचा हेतूच मुळी समजत नाही. पुण्य शुभ आहे. परंतु शुभामुळे मोक्ष मिळत नाही. मोक्ष तर शुद्ध भावामुळे मिळतो.
जीवादी पदार्थांच्या शुद्ध स्वरूपात ज्यांना अतूट श्रद्धा आहे ते सम्यक्त्वी आहेत. त्यांनाच आत्मज्ञान होते. रागादींचा त्याग चारित्र्य आहे. ती शुद्धोपयोगी अवस्था मुक्तीचा मार्ग आहे. तथाकथित विद्वान निश्चयार्थाला सोडून व्यवहारात प्रवृत्त होतात. परंतु परमार्थात आत्म्याच्या शुद्ध स्वरूपात आश्रित यतिमुनी कर्माचा क्षय करतात असे म्हटले आहे. पण केवळ व्यवहारात प्रवृत्त झाल्यामुळे कर्माचा क्षय होत नाही. २३
या गाथामध्ये आचार्य कुन्दकुन्दांनी शुद्धोपयोगाची महत्त्व उपादेयताचे वर्णन केले आहे. अशाप्रकारचे चिंतन साधकाला शुद्धोपयोगाकडे नेतो. आचार्य कुन्दकुन्द