________________
(६६५)
आहे अन्यांबरोबर निश्चयदृष्टीने त्याचा काही एक संबंध नाही. अन्य-अन्य आहे ते आत्म्यापासून सर्वथा भिन्न आहे. आत्मा शुद्ध, निर्मल आणि निरंजन आहे. त्याला पराश्रित मानणे म्हणजे आत्मस्वरूपापासून दूर जाणे आहे. हे पण शुद्ध भावनेचे एक रूप आहे.
आत्म्याचे शुद्ध स्वरूप कर्मांच्या आवरणामुळे आच्छादित होत जाते. कर्मप्रवाहाचा अवरोध करणे म्हणजे संवर आहे. कर्म आत्म्याशी संश्लिष्ट नाही झाले तर आत्म्याचे शुद्ध स्वरूप आवृत्त होत नाही. निर्जरा कर्माने आवृत्त आत्म्याला शुद्ध स्वरूपाला जाणण्याचा उपक्रम आहे. आत्म्याचे परिणाम शुद्ध असतील तर आत्माशुद्धाकडे जातो.
व आत्म्याच्या शुद्ध स्वरूपाचे साधक चिंतन करतो, तसे चिंतन करण्याकडे आकर्षित होतो. तशा शुद्धतोन्मुखी भावनांचे अध्यात्म-प्रवन आचार्यांनी आपल्या ग्रंथात वर्णन केले आहे.
___आचार्य कुन्दकुन्द जगतात अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात. त्यांनी निश्चयदृष्टीने आत्मभाव, परमात्मभाव, स्वभाव, परभाव इत्यादींचे समयसार, प्रवचनसार, पंचास्तिकाय इ. आपल्या ग्रंथांत जे विवेचन केले आहे ते वास्तविक मुमुक्षूना शुद्धभावाच्या दिशेने अग्रसर होण्याची प्रेरणा देतात. ते शुद्धोपयोग मूलक चिंतन, भावनावर प्रकाश टाकताना साधकाला सांगतात. ते चिंतन अशाप्रकारचे
"मी एक आहे, शुद्ध आहे, सदा अरूपी आहे, ज्ञानदर्शनमय आहे, कोणताही अन्य परमाणु मात्र माझा नाही.१४
सर्वज्ञ प्रभूने म्हटले आहे. हे सर्व सांसारिक भाव पुद्गल द्रव्याच्या परिणामामुळे आहेत. त्यांना जीव किंवा आत्मा कसे म्हणता येईल ? अर्थात् जीवपासून ते सर्वथा भिन्न आहेत. या सांसारिक भावाशी निश्चयात्मक दृष्टीने कोणताही संबंध नाही.१५
शुद्ध भावोन्मुखी चिंतन पुढे वाढवित ते लिहितात - जीवाचा कोणताही वर्ण कोणताही गंध नाही, रस नाही, स्पर्श नाही, रूप नाही, शरीर नाही, संस्थान नाही, संघनन नाही.१६ न राग, न द्वेष, न मोह, न कर्म, न नोकर्म हे सर्व तर पुद्गलद्रव्याचे परिणाम आहेत.१७
आत्मभावावर विशेष भर देताना लिहितात- मी एक आहे. शुद्ध आहे. ममत्वरहित आहे. ज्ञानदर्शनात निमग्न आहे, त्यातच स्थित आहे, त्यातच लीन आहे. या सर्व बहिर्भावांचा मी क्षय करतो.१८