________________
पाणी जसजसे निर्मळ होते, त्यातील घाण दूर झाल्यामुळे ते शुद्ध बनते तेव्हाच त्यात प्रतिबिंब स्पष्ट दिसते. जर पाणी गढूळ असेल तर प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही. याप्रमाणे आत्मस्वरूपाला समजावे. आत्म्यामध्ये जसजशा सत्-तत्त्वांची अभिरुची जागृत होते तसतसे तत्त्वगम्य होतात. सत्य तत्त्वांचा बोध प्राप्त होतो.८
र हे विवेचन आत्माचे शुद्ध स्वरूप, शुद्ध भाव व शुद्धोपयोग दृष्टीने केले आहे. तत्त्व-अभिरुची जागृत होणे आणि त्यानुसार तत्त्वज्ञानाचा साक्षात्कार होणे ही आत्म्याच्या शुद्ध अवस्थेशी संबंधित आहे. तत्त्वज्ञानाचे फळच हे आहे की जिज्ञासू जीवाला आत्म्याचे शुद्ध स्वरूप अनुभूत व्हावे.
____ कषायांनी आत्म्याला जखडून ठेवले आहे. त्या अवस्थेमुळे आत्मा आपल्या शुद्ध स्वरूपाला विसरून गेला आहे. म्हणून आगमकार सांगतात की आत्म्याला कसा, तपाच्या माध्यमाने, आत्म्याला चिकटलेले विकार दुर्बल करा, क्षीण करा, आपल्या स्वतःला जीर्ण करा. वासना, तृष्णा या वृत्तींना नष्ट करून टाका.
से कषाय व भोग या वृत्तींना क्षीण केले तर परिणामतः आत्मशुद्धी होते. आत्मशुद्धी हेच साधकाचे खरे साध्य आहे. पास पाच इंद्रिय, क्रोध, मान माया, लोभ आणि आपला आत्मा जे जिंकणे अतिशय कठिण आहे. वास्तविक साधकाचे हे दहा शत्रू आहेत. कारण हेच तर आत्म्याला त्याच्या शुद्ध दशेपासून दूर ठेवतात व अशुद्ध अवस्थेत नेतात. या दहा शबूंच्या केंद्रस्थानी आत्मा आहे. कारण इंद्रिय इ. शत्रू आत्म्याच्याच केंद्रात ठाण मांडून आहे. आत्म्याला त्यापासून जिंकून घेतल्यावर, वरा करून घेतल्यावर इंद्रिये व त्यांच्या दूषित वृत्ती म्हणजे कषाय स्वयमेव समाप्त होऊन जातात.१० कारण “छिन्ने मूले नैव शाखा न पत्रम्" मूळ नष्ट झाल्यावर झाडावर शाखा, प्रतिशाखा उगवतच नाही. पानफलं तर नाहीच नाही. म्हणन एका शुद्धोपयोगात संलग्न आत्मा शुद्धोपयोगात आणण्याचा पराक्रम जागृत करायला पाहिजे.
जो आपल्या आत्म्यात रममाण आहे, जो त्याच्या शुद्ध स्वरूपात सन्निहित आहे वास्तविक तोच सम्यग्दृष्टी आहे. हे सम्यकदृष्टीचे निश्चयात्मक लक्षण आहे. ही प्रक्रिया आंतरिक आहे.११
वास्तविक ज्ञान ते आहे ज्यामुळे तत्त्वांचा बोध होतो. चित्ताची अन्यत्र भटकणारी वृत्ती संयमित होते. मग आत्मा विशुद्धावस्था प्राप्त करतो. या जो चरण विप्रहीन-चरित्र-आचार रहित आहे त्याने कितीही शाखार्थ केला तरी
HEARTHOSRINISAPANNAYAnasworvanance
Homega